पहिल्या संभाजीनगर कलरीप्पायटू स्पर्धेत २३५ खेळाडूंचा सहभाग 

  • By admin
  • August 27, 2025
  • 0
  • 66 Views
Spread the love

एस वाय वॉरियर्स, किड्स प्राइड स्कूलला विजेतेपद 

छत्रपती संभाजीनगर ः छत्रपती संभाजीनगर जिल्हा कलरीप्पायटू संघटनेतर्फे आयोजित पहिली कलरीप्पायटू जिल्हास्तरीय सब ज्युनियर, ज्युनियर व सीनियर अजिंक्यपद स्पर्धेत फाईट या प्रकारात एसवाय वॉरियर्स अकॅडमीने पहिला क्रमांक मिळवला. इव्हेंट प्रकारात किड्स प्राइड स्कूलने विजेतेपद मिळवले. 

फाईट या प्रकारात ओलंपियान्स स्पोर्ट्स क्लब आणि द वर्ल्ड स्कूल यांनी दुसरा क्रमांक मिळावला तर अल्फराद स्कूल यांनी तिसरा क्रमांक मिळवला.
इव्हेंट या प्रकारात दुसरा क्रमांक निक्स मार्शल अकॅडमीने तर तिसरा क्रमांक  डायनामिक स्पोर्ट अकॅडमीने मिळवला. 

तर १४ वर्षांखालील मुलींच्या गटात बेस्ट फायटर अवॉर्ड सुकन्या दीपक आगळे या खेळाडूने मिळवला तर मुलांच्या गटात सोहम सुनील पारीपल्ली या खेळाडूने मिळवला. तर बारा वर्षांखालील मुलींच्या गटात जुबिया या खेळाडूने मिळवला तर मुलांमध्ये खान जोएब व जोहान यांनी मिळाला. 

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून राजलक्ष्मी भाजीभाकरे, सय्यद अंजुम शेख, किड्स प्राइड स्कूलचे चेअरमन वसीम, जिल्हा कलरीप्पायटू संघटनेचे अध्यक्ष डॉ दत्तात्रय भाजीभाकरे, उपाध्यक्ष निखिल पुसे, सचिव पंकज राठोड, सहसचिव राहुल गव्हाणे, प्रशिक्षक जहूर सय्यद, मास्टर मुदसिर, सद्दाम सय्यद, रिजवान, जुबेर, अबुलाला व वर्ल्ड स्कूलच्या प्रिन्सिपल रोशनी नलडीगा यांनी जिंकलेल्या खेळाडूंचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *