पुणे ः एलएक्सटी बॉर्न विनरतर्फे ३१ ऑगस्ट रोजी राहुल राणे आंतरराष्ट्रीय स्केटिंग केंद्र संत तुकाराम शुगर फॅक्टरी समोर, कासारसाई गाव, मुळशी येथे रोलर स्केटिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
ही स्पर्धा ५, ६, ७, ८, ९, १०, ११, १२, १३, १४ वर्षांखालील मुले व मुली तसेच १४ वर्षांवरील मुले व मुली अशा विविध गटात आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा ऍडजेस्टेबल स्केट्स (२०० मीटर्स अंतर) व्यावसायिक क्वाड स्केट्स (२०० व ४०० मीटर्स अंतर), फिटनेस इनलाइन स्केट्स (२०० व ४०० मीटर्स अंतर), व्यावसायिक इनलाईन (२०० व ४०० मीटर्स अंतर) या क्रीडा प्रकारात होणार आहे. प्रत्येक गटातील पहिल्या तीन विजेत्यांना अनुक्रमे सुवर्ण, रौप्य व कांस्यपदक आणि आकर्षक गिफ्ट व्हाउचर्स दिली जाणार असून चौथ्या व पाचव्या क्रमांकाच्या खेळाडूंना उत्तेजनार्थ पदक दिले जाईल तसेच प्रत्येक खेळाडूला सहभागाबद्दल प्रमाणपत्र दिले जाणार आहे.
गेली २३ वर्षे या स्पर्धेचे आयोजन केले जात असून दरवर्षी या स्पर्धेस वाढता प्रतिसाद मिळत आहे. यंदा या स्पर्धेचा पुणे फेस्टिवल अंतर्गत आयोजित केल्या जाणाऱ्या क्रीडा महोत्सवात समावेश करण्यात आला आहे.या स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या खेळाडूंनी रीता राणे, भ्रमण दूरध्वनी क्रमांक ९३२६४५००५१ किंवा ९६८९४२६०८९ यांच्याकडे संपर्क साधावा.