
शरयू जगताप, रितेश शेंडे यांची कर्णधारपदी निवड
छत्रपती संभाजीनगर ः नेटबॉल फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने हरियाणा नेटबॉल असोसिएशनच्या वतीने २८ ते ३१ ऑगस्ट या कालावधीत नेताजी सुभाषचंद्र बोस क्रीडा संकुल, पलवल (हरियाणा) येथे चौथी वरिष्ठ राष्ट्रीय फास्ट फाईव्ह नेटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघ जाहीर करण्यात आला.
निवड चाचणीतून निवडलेल्या महिला व पुरुष संघाचे राष्ट्रीय स्पर्धापूर्व प्रशिक्षण शिबीर छत्रपती संभाजीनगर येथे सतीश इंगळे यांच्या मार्गदर्शनात प्रशिक्षक ऋतुराज यादव (गोंदिया), सचिन दांडगे आणि प्राची बागुल (छत्रपती संभाजीनगर)ॉ यांनी प्रशिक्षण दिले. महाराष्ट्र संघाच्या महिला कर्णधारपदी आंतरराष्ट्रीय खेळाडू शरयू जगताप तर पुरुष संघाच्या कर्णधारपदी अनुभवी राष्ट्रीय खेळाडू रितेश शेंडे यांची निवड करण्यात आली.
पाच दिवसीय प्रशिक्षण शिबिरात तंत्रशुद्ध पद्धतीने सराव करीत संघाने पदक जिंकण्याची हमी दिली आहे. दोन्ही संघ छत्रपती संभाजीनगर येथून रवाना झाले आहे. महाराष्ट्र संघाला महाराष्ट्र हौशी नेटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष सतीश इंगळे, महासचिव डॉ शालिनी अंबटकर, डॉ एस नारायण मूर्ती, जिल्हा संघटनेचे अध्यक्ष धर्मेंद्र काळे यांनी शुभेच्छा दिल्या. राज्य प्रशिक्षण शिबिर यशस्वी करण्यासाठी आकाश सरदार, हर्षवर्धन मगरे, जयवर्धन इंगळे, संकेत यादव, विक्की मगरे, विक्रमसिंग कायटे, सन्नी देहाडे, रितेश दाभाडे, तालिब अन्सारी यांनी परिश्रम घेतले.
महाराष्ट्राचे संघ
पुरुष संघ – रितेश शेंडे (कर्णधार), आकाश गायकवाड, दीपक नेमाडे, भविष्य वाघ, दीपांशू रामटेके, निर्भय होगळे, दिग्विजय आटोळे, तुषार पाटील, श्रीकांत जाधव, वेदांत खापरे.
महिला संघ – शरायू जगताप (कर्णधार), गौरी शेंडे, साक्षी पाटील, सोनल वानखेडे, मीनल रावते, सलोनी इंगोले, सानिका वाघ, कांचन उबाड, साक्षी गोरे, सोनल चव्हाण.