
पुणे ः पुणे जिल्हा हौशी ॲथलेटिक्स असोसिएशनतर्फे २६ ऑगस्ट रोजी बालेवाडी स्टेडियम येथे आयोजित करण्यात आलेल्या मैदानी स्पर्धेत भालाफेक क्रीडा प्रकारात २० वर्षांखालील वयोगटात पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वाघिरे महाविद्यालय सासवड येथील सुमित शांताराम बधे याने ४६ मीटर भाला फेकून रौप्य पदक जिंकले.
२ सप्टेंबर रोजी बालेवाडी येथे संपन्न होणाऱ्या राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेसाठी त्याची निवड झाली आहे. त्याच्या घवघवीत यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पंडीत शेळके, उपप्राचार्य डॉ बी यु माने, डॉ संजय झगडे, कार्यालयीन अधीक्षक अशोक कोंढावळे, शारीरिक शिक्षण संचालक प्रा प्रीतम ओव्हाळ, प्रा विकास मुजुमले यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.