
ठाणे ः विभागीय पातळीवरील वुशु स्पर्धेत सरस्वती विद्यालय वासिंदच्या लावण्या सातपुते हिची निवड झाली आहे.
ठाणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अंतर्गत ठाणे जिल्हास्तरीय वुशू स्पर्धा देविका इंग्लिश मीडियम स्कूल काल्हेर येथे पार पडली. या स्पर्धेत लावण्या सातपुते हिने ६५ किलो वजन गटात प्रथम क्रमांक पटकावला. आर्यन जाधव याने ७० किलो वजन गटात प्रथम क्रमांक मिळवून त्याची विभागीय वुशू स्पर्धेसाठी निवड निश्चित केली आहे. तसेच हंसिका बिडवी, किमया विशे आणि काशिष विशे यांनी तृतीय क्रमांक मिळविला आहे.
या यशस्वी विद्यार्थ्यांना क्रीडा प्रमुख ठाकरे, क्रीडा शिक्षक दौलत चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले आहे. विद्यार्थी व वरील सर्व शिक्षकांचे विद्या विकास मंडळ वासिंदचे चेअरमन विठ्ठल सातवी, सेक्रेटरी रवींद्र शेलार यांनी अभिनंदन केले. तसेच प्राचार्या श्रीमती कांबळे, उपप्राचार्य सापळे, पर्यवेक्षक भोईर, पर्यवेक्षक धनगर यांनी कौतुक केले.