समृद्धी क्रीडा सेवा पुरस्कार जाहीर

  • By admin
  • August 28, 2025
  • 0
  • 26 Views
Spread the love

चंद्रकांत रेम्बर्सु, अरुण राठोड, संध्याराणी बंडगर, दीपक चिकणे पुरस्काराचे मानकरी

सोलापूर ः राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त समृद्धी कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ सोलापूर अंतर्गत समृद्धी स्पोर्ट्स क्लबच्या वतीने यंदाच्या वर्षापासून समृद्धी क्रीडा सेवा पुरस्कार क्लबचे संस्थापक सचिव संजय सावंत यांनी जाहीर केले.

लांबपल्याचा आंतराराष्ट्रीय धावपटू अरुण राठोड व आंतरराष्ट्रीय लॉन टेनिस खेळाडू संध्याराणी बंडगर हे पहिल्या खेळाडू पुरस्काराचे मानकरी ठरले. २१०० रुपये रोख, मानपत्र, सन्मानचिन्ह व शाल असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. खेळाडूंबरोबर क्रिकेटचे संघटक चंद्रकांत रेम्बर्सु व धनुर्विद्येचे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक दीपक चिकणे यांनाही समुद्धी पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. मानपत्र, सन्मानचिन्ह व शाल असे यांच्या पुरस्काराचे स्वरुप आहे. 

क्लबने यासाठी क्रीडा पत्रकार अजितकुमार संगवे, माजी तालुका क्रीडाधिकारी व आंतरराष्ट्रीय खो-खोपटू सत्येन जाधव आणि तालुका क्रीडा अधिकारी गणेश पवार यांची निवड समिती नियुक्ती केली होती. या निवड समितीने ही निवड केली आहे. याचे वितरण २९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६.४५ वाजता विजापूर रोड येथील मयूरवन हॉटेलच्या हॉलमध्ये होईल.

हा पहिलाच पुरस्कार वितरण समारंभ यशस्वीपणे पार पाडण्यासाठी क्लबचे अध्यक्ष राजू प्याटी, उपाध्यक्ष रामचंद्र दत्तू,  राजन सावंत, कार्यकारी अध्यक्ष शोएब बेगमपुरे, कार्याध्यक्ष सुरेश भोसले, सल्लागार चंद्रकांत होळकर, रमेश बसाटे, मल्हारी बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली संतोष जाधव, संजय बनसोडे, राजकुमार कोळी, शाहनवाज मुल्ला, पुंडलिक कलखांबकर, गणेश कुडले, रवींद्र चव्हाण व शिवाजी वसपटे हे सदस्य प्रयत्नशील आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *