
एमजीएम संस्थेत राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा
छत्रपती संभाजीनगर ः महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या क्रीडा विभागाच्या वतीने राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून आंतर शालेय व आंतर महाविद्यालय स्पर्धेचे उद्घाटन एमजीएम स्पोर्ट्स क्लब अँड स्टेडियम येथे भारतीय क्रीडा प्राधिकरण छत्रपती संभाजीनगरच्या सहाय्यक संचालिका डॉ मोनिका घुगे यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमास परीक्षा नियंत्रक डॉ एच एच शिंदे, उपकुलसचिव डॉ परमिंदर कौर, प्रा आर आर देशमुख, क्रीडा संचालक नितीन घोरपडे, विभाग प्रमुख डॉ दिनेश वंजारे, प्राध्यापक, विद्यार्थी व सर्व संबंधित उपस्थित होते.

या प्रसंगी बोलताना डॉ मोनिका घुगे म्हणाल्या की, हॉकीचे जादूगर असणारे मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त आपण दरवर्षी राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करत असतो. यानिमित्त एमजीएम विद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धांमध्ये विजयी झालेल्या सर्व खेळाडूंचे मी सर्वप्रथम अभिनंदन करते. आणि ज्यांना या स्पर्धेमध्ये यश मिळाले नाही त्यांना हे लक्षात ठेवले पाहिजे की, जीवनात यश- अपयश हे कायम नसते. प्रत्येकांनी एक खेळ खेळणे आवश्यक आहे. स्वस्थ शरीर असेल तर मन स्थिर असेल आणि मन स्थिर असेल तर आध्यात्मिक प्रगती होईल. आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी खेळ आवश्यक आहे. आपण भारत विश्वगुरु म्हणतो, त्याचीही सुरूवात खेळापासून होते, असे डॉ मोनिका घुगे यांनी सांगितले.
जलतरण स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संपन्न झाल्यानंतर मान्यवरांनी रायफल शूटिंग आणि बुद्धिबळ स्पर्धेच्या ठिकाणी भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ श्रीनिवास मोतीयेळे यांनी केले.
या स्पर्धेच्या यशस्वितेसाठी डॉ शशिकांत सिंग, डॉ श्रीनिवास मोतीयेळे, जॉय थॉमस, डॉ सदाशिव जव्हेरी, डॉ रहीम खान, विलास राजपूत, हर्षदा नीठवे, सुनील चव्हाण, निलेश खरे, निरंजन फडके, आनंद राजहंस, लक्ष्मण सूर्यवंशी, अर्जुन तोडके, भाऊसाहेब फुले आदींनी परिश्रम घेतले.