
नवी दिल्ली ः अग्रणी मानांकित १७ वर्षीय अनाहत सिंगने स्क्वॅश चॅम्पियनशिप जिंकून राष्ट्रीय विजेतेपदांची हॅटट्रिक पूर्ण केली. तिने दुसऱ्या मानांकित आकांक्षा साळुंकेचा ११-७, ११-६, ११-४ असा पराभव केला. पुरुष गटात, वेलावन सेंथिलकुमारने गतविजेत्या अभय सिंगचा ११-८, ११-९, ४-११, ११-८ असा पराभव करून विजेतेपद पटकावले.
आकांक्षा साळुंकेने उपांत्य फेरीत जोशना चिनप्पा हिचा पराभव केला. २०२२ मध्ये अनाहत उपविजेता होती, त्यानंतर तिने सलग तीन राष्ट्रीय जेतेपदे जिंकली आहेत. हे सेंथिलकुमारचे दुसरे राष्ट्रीय जेतेपद आहे, त्याने २०२३ मध्ये यापूर्वी जिंकले होते. गेल्या दोन वेळा तो अंतिम फेरीत अभय सिंगकडून पराभूत होत होता.
२०२३ मधील विजयानंतर वेलावनचे हे दुसरे राष्ट्रीय विजेतेपद होते. गेल्या दोन अंतिम सामन्यांमध्ये अभयकडून झालेल्या पराभवाचा बदला घेत त्याने हा विजय आणखी संस्मरणीय बनला. ही स्पर्धा दिल्लीतील मेजर ध्यानचंद स्टेडियमवर खेळवण्यात आली. सात वर्षांत पहिल्यांदाच राष्ट्रीय राजधानीने या प्रमुख देशांतर्गत स्पर्धेचे आयोजन केले आहे.