एक्संलट तायक्वांदो अकॅडमीतर्फे कलर बेल्ट वितरण सोहळा उत्साहात संपन्न

  • By admin
  • August 29, 2025
  • 0
  • 13 Views
Spread the love

 ७२ खेळाडू कलर बेल्ट परीक्षा उत्तीर्ण

मुंबई ः एक्सलंट तायक्वांदो अकॅडमी, मिरा रोड ठाणेतर्फे आयोजित बेल्ट परीक्षेत ७२ खेळाडूंनी यश संपादन केले. तायक्वांदोच्या जागतिक अभ्यासक्रमानुसार बेसिक, टेक्निक, फाईट, पुमसे आणि शिस्त या घटकांची काटेकोर चाचणी घेण्यात आली होती या वेळी परीक्षक म्हणून ठाणे जिल्हा तायक्वांडो संघटनेच्या वतीने आदित्य कांबळे उपस्थित होते.

सेंट जॉन्स मॅरेथॉमा चर्च हॉल, मिरा रोड पूर्व ठाणे येथे नुकत्याच झालेल्या बेल्ट वितरण सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून मलेशियात पार पडलेल्या १०व्या एशियन पॅरा तायक्वांदो स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता आनंद धोंडे, सचिन हुळे, घनश्याम लोटलीकर, तसेच प्रतीक सुकळे हे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या व खेळाडूंच्या हस्ते दीप प्रज्वलन करुन करण्यात आली.

या सोहळ्यात प्रमुख अतिथींचे राष्ट्रीय तायक्वांदो प्रशिक्षक गजेंद्र गवंडर यांनी तुळशीचे रोप व भेटवस्तू देऊन सत्कार केला. तसेच पॅरा एशियन स्पर्धेतील सुवर्णपदक दिव्यांग खेळाडू आनंद धोंडे यांचा विशेष गौरव करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात खेळाडू आशितोष यांनी स्वागत गीत सादर केले व उपस्थित सर्वांचे मन जिंकले. प्रशिक्षक गजेंद्र गवंडर यांनी पालक व विद्यार्थ्यांना तायक्वांदो खेळाचे महत्त्व व आहाराचे स्थान याविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सचिन हुळे यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले व बजाज आलाय लाइफ इन्शुरन्स कंपनी येणाऱ्या काळात खेळाडूंच्या पाठीशी उभी राहिल, शेवटी आनंद धोंडे यांनी खेळाडूंशी प्रेरणादायी संवाद साधला व मलेशिया ते संपन्न झालेल्या आशियाई राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेचा अनुभव सांगितला.

प्रशिक्षक कांचन गवंडर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी पंचेस, ब्लॉक्स, फ्लाईंग किक्स आणि कौलारू फोडण्याचे चित्त थरारक प्रात्यक्षिक सादर करून उपस्थित मान्यवरांची दाद मिळवली. यावेळी दहावी व बारावी मध्ये उत्तीर्ण झालेल्या खेळाडूंचा तसेच तायक्वांडो चे दिव्यांग खेळाडू व त्यांच्या पालकांचा विशेष सत्कार करण्यात आला यामध्ये  इक्ष्वाकु वशिशत यांनी पूमसे सादर केले व झीशान मोंडल, संस्कार बावसाकर व हसन यांनी किक, पंच, व पुशप करून दाखविले.

या यशस्वी कार्यक्रमाबद्दल अकॅडमीचे संस्थापक निरज बोरसे, राष्ट्रीय प्रशिक्षक लता कलवार, तसेच ठाणे जिल्हा तायक्वांदो संघटनेचे अध्यक्ष तुकाराम म्हात्रे, उपाध्यक्ष सलील झवेरी, दीपक मालुसरे, सचिव कौशिक गरवालिया, खजिनदार सुरेंद्र कांबळी, सदस्य श्रीकांत शिवगण, प्रमोद कदम यांनी प्रशिक्षक गजेंद्र गवंडर व कांचन गवंडर यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

परीक्षा उत्तीर्ण झालेले खेळाडू

यलो बेल्ट ः ओवी वऱ्हाडी, अनन्या गोरे,  पृथा व्यास, देवश्री खवालिया, आरोही यादव, शिवेक माणुसमारे, श्रावणी सकपाळ, अनन्या रावत, स्वानंद शिंदे, रितिका राजपूत, आशी राजपूत, स्वरा सकपाळ, शार्दुल पेडणेकर, जॉयना थेवर, मेहक पात्रा, इक्ष्वाकु वशिषत, कियारा भालाळा.

ग्रीन बेल्ट ः मोहित तिरुवा, व्रिशा बारगोडे, शौर्य धुरी, माही वले, शिवाण्या  विनुथ मेंडन, अद्विक अग्रवाल, इविका त्रिपाठी, मोनिका तिरुवा, अनिश लोहार, निष्का सनील, देवांश रावत, अंशिका लोहार, प्रिशा शुक्ला, युक्ती जंगम, मंथन रावत, झीनल दाबी.

ग्रीन बेल्ट ः ऋषिकेश कुलकर्णी, राघवेंद्र कुलकर्णी, साक्षी पात्रा, युवराज सिंग, विक्रांत पांडे, सावी खोपकर, सौम्या गुप्ता, श्रुतिका जाधव.

ब्लू – बेल्ट ः दिवित पुजारी, विबा अग्रवाल, सानिध्या मिश्रा, कादंबरी कदम, क्षितिजा पाटील, रामकृष्णन कोनार, पार्थ चौधरी, हार्दिक आर्य, श्रुतिका जाधव.

ब्लु – १ बेल्ट ः विदिशा करवा, समृद्धी जाधव, खुशी तिवारी, आदित्य सुरेंद्रन.

रेड बेल्ट ः पियुषा जैन, पार्थ आगेडकर, क्षितिजा नादवडेकर, लेखा आगेडकर, दिव वेलानी, अन्विता सावंत, शौर्य गणवीर, स्वरा मोहिते, अनिकेत कुलकर्णी, प्रणील नादवडेकर, अमृता कुलकर्णी,  निती वेलानी, पूर्ती जैन, मंथन वापिलकर.

रेड १ बेल्ट ः विवान माने, श्रुतिप्रज्ञान साहू, कृष्णा शुक्ला, जान्हवी जंगम, श्री चव्हाण.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *