
पुणे ः कोकणस्थ परिवार पुणेच्या वतीने राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त राष्ट्रीय अंध बुद्धिबळ खेळाडू राजू सोळंके याचा खास सत्कार अंधाच्या क्रिकेटमधील जगज्जेता टीम सदस्य अमोल कर्चे यांचे हस्ते पंडीत नेहरू स्टेडियम पुणे येथे करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी क्रीडा संघटक सुनील नेवरेकर हे होते. राजू सोळंके याने हैदराबाद, जयपुर, अमरावती आदी ठिकाणी बुद्धिबळ स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आहे. तसेच स्वीमिंगमध्ये देखील विविध स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे. शंतनु धंगेकर याने स्वागत केले. रोहित भरगुणे यांनी प्रास्ताविक केले. दत्ता शिंदे यांनी आभार मानले. चंद्रकांत खराटे यांनी सूत्रसंचालन केले. संदीप जाधव, ऋषिकेश राजमाने, विजय लामतुरे, गणेश निकम आदींनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.