
नाशिक ः राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांचा ३१ ऑगस्ट रोजी नाशिकच्या विविध खेळांच्या संघटना, क्रीडा संस्था आणि खेळाडू यांच्या वतीने नागरी सत्कार करण्यात येणार आहे.
माणिकराव कोकाटे हे नाशिक जिल्ह्याचे पहिले क्रीडा मंत्री आहेत. त्यामुळे क्रीडा संघटनांतर्फे हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. येत्या रविवारी हा सत्कार समारंभ गोखले शिक्षण संस्थेच्या बीवायके कॉलेज परिसरातील गुरुदक्षिणा हॉलमध्ये दुपारी ४ वाजता संपन्न होणार आहे.
क्रीडा मंत्री म्हणून माणिकराव कोकाटे यांच्याकडून भरीव कामगिरी व्हावी, त्यांना योग्य ते पाठबळ मिळावे यासाठी नाशिकचे सर्व राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू, क्रीडा संघटक, प्रशिक्षक, क्रीडा संघटना, क्रीडा संस्था, अर्जुन पुरस्कार आणि शिव छत्रपती पुरस्कार प्राप्त सर्व खेळाडू, संघटक, प्रशिक्षक हे सर्व त्यांच्या बरोबर आहेत याची खात्री म्हणून या सत्कार समारंभाचे प्रयोजन केले आहे.
यासाठी नाशिकचे विविध खेळांचे सर्व खेळाडू, क्रीडा संघटक, प्रशिक्षक, क्रीडा संस्थांचे पदाधिकारी, प्रतिनिधी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात येत आहे.