
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन
छत्रपती संभाजीनगर ः छत्रपती संभाजीनगर शहरातील प्रसिद्ध पीईएस शारीरिक शिक्षण महाविद्यालय येथे या वर्षीचा राष्ट्रीय क्रीडा दिन व महाविद्यालयाचा ४१ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या निमित्ताने महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये १०० मीटर, ८०० मीटर, १६०० मीटर धावणे, गोळा फेक, रस्सीखेच या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयातील एकूण दोनशे विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग नोंदविला.

१०० मीटर मुलींच्या धावण्याच्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक गायत्री कायंदे, द्वितीय क्रमांक वैष्णवी पठाडे व तृतीय क्रमांक अंतकला मुकादे यांनी मिळविला. ८०० मीटर धावण्याच्या मुलींच्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक सत्यशीला रिठे, द्वितीय क्रमांक संगीता पाटील व तृतीय क्रमांक दीपाली पाचपुते यांनी मिळविला. गोळा फेक मुलींच्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक सोनाली पाटील, द्वितीय क्रमांक सुमित्रा घुले व तृतीय क्रमांक सत्यशीला रिठे यांनी पटकावला.
तसेच मुलांच्या १०० मीटर धावणे स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक रवी अंभोरे, द्वितीय क्रमांक ऋषी शिंदे व तृतीय क्रमांक साहिल बंडारे यांनी पटकवला. तसेच मुलांच्या १६०० मीटर धावण्याच्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक अर्जुन गायकवाड, द्वितीय क्रमांक सदानंद रानमले व तृतीय क्रमांक योगेश राजपूत यांनी मिळवला. त्याचप्रमाणे मुलांच्या गोळाफेक स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक सिद्धेश्वर नागरे, द्वितीय क्रमांक आकाश देशमुखे व तृतीय क्रमांक पवन आंधळे यांनी मिळविला.
राष्ट्रीय क्रीडा दिन व महाविद्यालयाचा वर्धापनदिननिमित्त सदरील स्पर्धा यशश्वीरीत्या पार पाडण्याकरीता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शिवाजी सूर्यवंशी, प्रा मंगेश डोंगरे, प्रा राजेंद्र पठानिया, प्रा संतोष कांबळे, प्रा जी श्रीकांत, प्रा गौतम गायकवाड, प्रा सय्यद मझहर, ग्रंथपाल. डॉ श्यामला यादव, अनिल बागुल, अक्षय दाणे, मुर्तुजा बेग, सुनील शिंदे, पंकज सोनवणे यांनी परिश्रम घेतले.