
सोलापूर ः नेहरूनगर येथील श्री सुशीलकुमार शिंदे कॉलेज ऑफ फिजिकल एज्यूकेशनच्या विद्यार्थ्यांनी विविध ठिकाणी क्रीडा दिनाचे आयोजन करुन क्रीडा दिनाचे व व्यायामाचे महत्व पटवून दिले.
महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी क्रीडा दिन विविध ठिकाणावरील शाळा, महाविद्यालय, अकॅडमी जवळील खेळांचे मैदान, क्रीडा असोसिएशन, गाव, गल्ली, शासकीय मैदान आदी ठिकाणी क्रीडा दिनाचे औचित्य साधून विविध स्पर्धांचे आयोजन करुन क्रीडा दिनाचे व व्यायामाचे महत्व पटवून सांगितले.
राष्ट्रीय क्रीडा दिनाचा कार्यक्रम व स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष सुभाष चव्हाण, उपाध्यक्ष विवेक चव्हाण, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ कलाश्री देशपांडे, प्रा नागनाथ पुदे, प्रा विजय तरंगे, सुनील राठोड, अनिल राठोड यांनी परिश्रम घेतले.