
जळगाव ः जळगाव जिल्हा १३ वर्षांखालील मुले व मुली जिल्हा बास्केटबॉल संघ निवड चाचणीचे आयोजन रविवारी (३१ ऑगस्ट) एम एम महाविद्यालयातील पाचोरा बास्केटबॉल ग्रुपच्या बास्केटबॉल मैदानावर सकाळी १० वाजता करण्यात आलेले आहे.
या निवड चाचणीमध्ये १ जानेवारी २०१२ नंतर जन्म असलेले खेळाडू पात्र राहतील तसेच जिल्हा संघ निवड चाचणी करिता उपस्थित राहताना खेळाडूंनी त्यांचे स्वतःचे आधार कार्ड, शाळेचे बोनाफाईट, वयाचा दाखला याची साक्षांकित प्रत सोबत आणावी. जळगाव जिल्हा संघ निवड चाचणीतून जो संघ निवडण्यात येणार आहे तो संघ महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल संघटनेतर्फे आयोजित १३ वर्षांखालील आंतर जिल्हा राज्य अजिंक्यपद बास्केटबॉल स्पर्धेत खेळणार आहे ही स्पर्धा सोलापूर येथे होणार आहे.
या निवड चाचणीकरिता जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभाग घ्यावा असे आवाहन जितेंद्र शिंदे, निलेश पाटील यांनी केले आहे, असे महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल संघटनेचे सहसचिव जयंत देशमुख यांनी कळवले आहे.