
आमदार बालाजीराव कल्याणकर यांच्या हस्ते उद्घाटन
नांदेड ः महाराष्ट्र राज्य सेपक टकरॉ असोसिएशनच्या मान्यतेने नांदेड जिल्हा सेपक टकरॉ असोसिएशन नांदेड व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय क्रीडा दिन व मेजर ध्यानचंद यांच्या जयंती निमित्त आयोजित २५व्या सब ज्युनियर व २६ व्या ज्युनियर सेपक टकरॉ स्पर्धेचे शानदार उद्घाटन करण्यात आले.
नांदेड जिल्हा क्रीडा संकुलातील इनडोअर हॉल येथे २९ ऑगस्ट रोजी शानदार उद्घाटन सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संत बाबा बलविंदर सिंघजी (सचखंड गुरुद्वारा, नांदेड) हे होते. आमदार बालाजीराव कल्याणकर यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पोलिस अधीक्षक अविनाश कुमार, नांदेड जिल्हा सेपक टकरा संघटनेचे अध्यक्ष सुशीलकुमार जाधव, जिल्हा उपाध्यक्ष रुपेश पाडमुखे, राज्य उपाध्यक्ष हनुमंत लुंगे, प्रवीण कुपटीकर, आयोजन समितीचे सचिव रवी बकवाड, राज्य स्पर्धा समन्वयक डॉ विनय मुन, राज्य कार्यकारिणी सदस्य गणेश माळवे, लक्ष्मण फुलारी, जिल्हा सचिव इकबाल मिर्झा आदी मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्यातील ७२ संघातील खेळाडू, मार्गदर्शक व संघ व्यवस्थापक, पंच, राज्य पदाधिकारी सर्वं ११५० जण या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. ध्वजारोहण प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन व तसेच दीप प्रज्वलन करण्यात आले. मार्च पास करत महाराष्ट्र राज्यातील ७२ संघांनी खेळाडूंनी प्रमुख पाहुण्या सलामी दिली. नांदेड जिल्हा सेपक टकरॉ संघटनेचे सचिव प्रवीण कुपटीकर यांनी प्रास्ताविक केले. या प्रसंगी आमदार बालाजीराव कल्याणकर, पोलिस अधीक्षक अविनाशकुमार यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिर्झा आसिफ यांनी केले. जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांनी आभार मानले. या प्रसंगी जिल्हा सचिव रामचंद्र दत्तू, शेख चांद, दीपक निकम, डॉ परवेज खान, मनोज बनकर, विनय जाधव, चेतन पगवाड, सचिन शेळके, संदीप तसेच बालाजी शिरषीकर, संजय बेत्तेवार, शुभम पाडदे, दिलीप हनमते, दिलीप सूर्यवंशी, अनिकेत सरपाते आदी उपस्थित होते.