
प्राचार्य घनश्याम ढोकरट यांच्या हस्ते सत्कार
छत्रपती संभाजीनगर ः देवगिरी महाविद्यालयात मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस ‘राष्ट्रीय क्रीडा दिन’ म्हणून शारीरिक शिक्षण आणि क्रीडा विभागाच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला.
या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष देवगिरी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अशोक तेजनकर तर प्रमुख अतिथी म्हणून मुंबई येथील शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ घनश्याम ढोकरट हे उपस्थित होते. या कार्यक्रमास उपप्राचार्य डॉ रवी पाटील, उपप्राचार्य डॉ गणेश मोहिते, उपप्राचार्या डॉ अपर्णा तावरे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा सुरेश लिपाने, प्रा अरुण काटे, प्रा विजय नलावडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमा पूजना नंतर क्रीडा विभाग प्रमुख प्रा. शेखर शिरसाठ यांनी प्रास्ताविक केले. या प्रसंगी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील देवगिरी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी असलेले नामवंत ॲथलेटिक्स राष्ट्रीय प्रशिक्षक सतीश पाटील, कबड्डीचे राष्ट्रीय क्रीडा प्रशिक्षक डॉ माणिक राठोड, बास्केटबॉल राष्ट्रीय प्रशिक्षक गणेश कड, व्हॉलीबॉल राष्ट्रीय प्रशिक्षक कृष्णा शिंदे, कुस्तीचे राष्ट्रीय प्रशिक्षक प्रा मंगेश डोंगरे, बास्केटबॉलचे प्रशिक्षक संदीप ढंगारे तसेच क्रीडा अधिकारी रेखा परदेशी यांचा पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.
महाराष्ट्र शासनाच्या स्पोर्ट्स कोट्या अंतर्गत देवगिरी महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांनी शासकीय सेवेत नोकरी मिळवल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. तुषार आहेर यांची सहाय्यक क्रीडा अधिकारी प्रशिक्षण गट क पदी नियुक्त झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. राष्ट्रीय अॅथलेटिक्स खेळाडू स्नेहल हरदेंचा पोलीस उपनिरीक्षकपदी नियुक्त झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. राष्ट्रीय खो-खो कल्याणी सोनवणे आणि राष्ट्रीय बास्केटबॉल खेळाडू जयराज तिवारी खेळाडू यांची कारागृह पोलीसपदी नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. तसेच या प्रसंगी देवगिरी महाविद्यालयातील राज्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा देखील गौरव करण्यात आला.
प्रमुख ख अतिथी प्राचार्य डॉ घनश्याम ढोकरट यांनी या प्रसंगी खेळाडूंना मार्गदर्शन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. अध्यक्षीय समारोप प्राचार्य डॉ अशोक तेजनकर यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा परसराम बचेवाड यांनी केले. राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यासाठी क्रीडा विभाग प्रमुख डॉ शेखर शिरसाठ, कनिष्ठ क्रीडा विभाग प्रमुख प्रा राकेश खैरनार, डॉ राणी पवार, ईशांत राय, रोहित तुपारे, अजय सोनावणे, लता कालवर, प्रा मंगल शिंदे, शुभम गवळी, अमोल पगारे, कृष्णा दाभाडे, पंडित भोजने, शेख शफी आदींनी प्रयत्न केले.