
विभागीय क्रीडा संकुलात आयोजन
छत्रपती संभाजी नगर : छत्रपती संभाजी नगर महानगरपालिका व छत्रपती संभाजी नगर जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र योगासन स्पोर्ट असोसिएशन व बृहन महाराष्ट्र योग परिषद अमरावती यांच्या तांत्रिक सहकार्याने आयोजित राज्य योगासन स्पर्धेचे उद्घाटन विभागीय क्रीडा संकुल गारखेडा स्टेडियम येथे उत्साहात संपन्न झाले.
या स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी मंचावर आयोजन समितीचे स्वागताक्ष राजेश मिरकर, महानगरपालिका क्रीडा अधिकारी संजीव बालय्या, युवा भारत जिल्हा प्रभारी कैलास पवार, योगासन स्पोर्ट असोसिएशनचे सचिव राजेश पवार, डॉ संदीप जगताप, डॉ पंढरीनाथ रोकडे, आयोजन समितीचे सचिव सुरेश मिरकर, स्पर्धा प्रमुख छाया मिरकर, महाराष्ट्र राज्य संघटनेचे खोडस्कर, विनायक अंजनकर, संजय देशमुख, सुहास पवळे, संजय देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती.
या प्रसंगी दिल्ली येथे झालेल्या आशिया स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता महाराष्ट्राचे खेळाडू धनश्री लेकुरवाळे, डॉ शरयु विसपुते, सोनाली खरमाटे, भारत डेल्लीकर यांचा मान्यवरच्या हस्ते गौरव करण्यात आला. उद्घाटन प्रसंगी छत्रपती संभाजी नगर जिल्हा योग संघटनेच्या खेळाडूंनी योगाची प्रात्यक्षिके सादर करुन उपस्थितांची मने जिंकली.