
जळगाव ः बंगळुरू येथील बीसीसीआय अंतर्गत चालणाऱया नॅशनल क्रिकेट अकॅडमीच्या हाय एक्सलन्स सेंटर येथे बीसीसीआयची लेव्हल २ परीक्षा होणार आहे. या परीक्षेसाठी जळगावचे क्रिकेट प्रशिक्षक पंकज महाजन यांची निवड झाली आहे.
क्रिकेट प्रशिक्षक पंकज महाजन यांनी २०२२ मध्ये बीसीसीआय लेव्हल १ परीक्षा उत्तीर्ण केली होती. त्या अगोदर त्यांनी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनची लेव्हल शून्य परीक्षा उत्तीर्ण करून, लेव्हल १ परीक्षेसाठी प्रवेश मिळवला होता.
पंकज महाजन हे खानदेशातील एकमेव बीसीसीआय लेव्हल १ परीक्षा उत्तीर्ण करणारे क्रिकेट प्रशिक्षक आहेत. पंकज महाजन हे २००४ पासून जळगाव खानदेशात क्रिकेट प्रशिक्षक म्हणून काम करीत असून त्यांनी आजतयागत असंख्य खानदेशातील क्रिकेटपटूंना क्रिकेटचे धडे दिले आहेत.
पंकज महाजन यांना बीसीसीआय लेव्हल १ साठीचे मार्गदर्शन अतुल गायकवाड, मंदार दळवी, रणजीत देसाई तसेच दिनेश नानावटी, भारताचे पूर्व यष्टिरक्षक साबा करीम, नंदुरबारचे सचिव युवराज पाटील, एकलव्य क्रीडा संकुलाचे प्रशासकीय अधिकारी श्रीकृष्ण बेलोरकर आदी क्रिकेट क्षेत्रातील तसेच क्रीडा क्षेत्रातील गुरुवर्यांकडून मिळाले आहे. पंकज महाजन यांनी याव्यतिरिक्त एनआयएस केले आहे.