
महापालिकेच्या क्रीडा विभागाची माहिती
सोलापूर ः लॉन टेनिस स्पर्धेने यंदाच्या मोसमातील शालेय शहर पातळीवरील क्रीडा स्पर्धेस सुरुवात होणार आहे.
या स्पर्धेस एक सप्टेंबरपासूनच सुरुवात होणार होती. त्याप्रमाणे स्पर्धेचे वेळापत्रक सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी जाहीर केले होते. 46 खेळांच्या स्पर्धांच्या तारखा त्यांनी जाहीर केल्या होत्या. परंतु एक तारखेच्या किक बॉक्सिंग व शूटिंग बॉल व दोन तारखेच्या स्क्वॅश या तीन खेळांचे स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्या असल्याचे महापालिकेच्या क्रीडा विभागाने सांगितले. या स्पर्धेसाठी संबंधित जिल्हा संघटना आणि क्रीडा शिक्षकांचे सहकार्य घेतले जात आहे.
विविध क्रीडा स्पर्धांचे वेळापत्रक
खेळ प्रकार, स्पर्धा कालावधी व स्पर्धेचे स्थळ या क्रमाने :
सप्टेंबर : लॉन टेनिस (२ व ३, जिल्हा क्रीडा संकुल, कुमठा नाका), टेबल टेनिस (३, मुळे पॅव्हेलियन हॉल, पार्क चौक), तलवारबाजी (३ ते ५, राजीव गांधी इनडोअर स्टेडियम, सात रस्ता), तायक्वांदो ( ४ ते ५), रोलर स्केटिंग/रोलर हॉकी ( ७, जिल्हा क्रीडा संकुल, कुमठा नाका), कराटे (८ व ९, राजीव गांधी इन्डोअर स्टेडियम), वुशु (८ व ९, बीपीएड कॉलेज, नेहरु नगर), डॉजबॉल (८ व ९, राजीव गांधी इनडोअर स्टेडियम, सात रस्ता), बुद्धिबळ (८ ते १०, पार्क जिमखाना हॉल), नेहरु हॉकी (८ ते १०, शासकीय मैदान, नेहरु नगर), मल्लखांब (१० व ११, लोकमंगल प्रशाला, अवंती नगर), बॅडमिंटन (१० व ११, जिल्हा क्रीडा संकुल, कुमठा नाका), जलतरण, वॉटरपोलो, डायव्हिंग (१० ते ११) श्री मार्कंडेय जलतरण तलाव, अशोक चौक), बॉक्सिंग (११ व १२ पार्क जिमखाना हॉल), टेनिक्वाईट (११ व १२, राजीव गांधी इनडोअर स्टेडियम, सात रस्ता), मैदानी (११ ते १३, एस आर पी एफ कॅम्प मैदान, सोरेगाव, विजापूर रोड), बास्केटबॉल ( १२ ते १४, राजीव गांधी इनडोअर स्टेडियम, सात रस्ता), फुटबॉल (१३ ते १८, फुटबॉल मैदान, वालचंद इंजिनिअरिंग कॉलेज, अक्कलकोट रोड), योगासन ( १३ व १४, पार्क जिमखाना हॉल), जिम्नॅस्टिक्स (१३ व १४, बीपीएड कॉलेज, नेहरु नगर), व्हॉलीबॉल (१४ ते १६, हरिभाई देवकरण प्रशाला), कुस्ती (१५ व १६, श्रीकृष्ण कुस्ती केंद्र, डोणगाव रोड), क्रिकेट (१५ ते १८, हरीभाई देवकरण प्रशाला), नेट बॉल (१७ व १९, रॉजर्स इंग्लिश मीडियम स्कूल), बॉल बॅडमिंटन (१७ व १८, जिल्हा क्रीडा संकुल, कुमठा नाका), मॉडर्न पेंटॅथलॉन (१७, वीर सावरकर जलतरण तलाव, पार्क चौक), ज्युदो (१८ व १९, छत्रपती शिवाजी ज्युनिअर नाईट कॉलेज, सरस्वती चौक), खो-खो (१९ ते २१, जय जवान जय किसान, मुलांची सैनिकी शाळा, नेहरु नगर), शूटिंग (२० व २१, आयएमएस स्कूल, जुळे सोलापूर), बेसबॉल (२२ ते २४, मल्लीकार्जुन हायस्कूल, हत्तुरे वस्ती), कॅरम (२३ ते २५, पार्क जिमखाना हॉल), रग्बी (२३ व २४, ग्रामीण पोलिस मुख्यालय मैदान, अॅच्युअर्स हॉलच्यासमोर), कबड्डी (२४ ते २६, राजीव गांधी इनडोअर स्टेडियम), सॉफ्ट टेनिस(२५ व २६, जिल्हा क्रीडा संकुल, कुमठा नाका), रोल बॉल (२५, राजीव गांधी इनडोअर स्टेडियम, सात रस्ता), आट्यापाट्या (२६ ते २८, जिल्हा क्रीडा संकुल, कुमठा नाका), हँडबॉल (२९ ते दि.१, राजीव गांधी इनडोअर स्टेडियम, सात रस्ता), सेपक टकरॉ (२९ ते १, जय जवान जय किसान, मुलांची सैनिकी शाळा, नेहरु नगर), सायकलिंग रोडरेस /ट्रॅक (३०, प्रताप नगर तांडा रोड पोतदार शाळा शेजारी विजापूर रोड).
ऑक्टोबर : (धनुर्विद्या) आर्चरी (२, जिल्हा क्रीडा संकुल, कुमठा नाका), शालेय हॉकी (२ ते ४, शासकीय मैदान, नेहरु नगर), सॉफ्टबॉल (७ ते ९, मल्लीकार्जुन हायस्कुल, हत्तुरे वस्ती) वेटलिफ्टिंग (१६ व १७, छत्रपती शिवाजी नाईट कॉलेज, मुरारजी पेठ).
नंतर जाहीर करण्यात येणाऱ्या स्पर्धा : किक बॉक्सिंग (पार्क जिमखाना हॉल, चार पुतळा पाठमागे ) शुटिंग बॉल ( सुभाष उद्यान, गार्डन, जिजामाता हॉस्पिटल शेजारी, स्क्वॅश ( इंदिरा गांधी स्टेडियम, पार्क चौक).