
ओतूर : ग्राम विकास मंडळ ओतूर यांच्या व्यवस्थापनाखाली असलेल्या चैतन्य विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी जिल्हा क्रीडा परिषद पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे आणि समर्थ ज्युनियर कॉलेज बेल्हे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जुन्नर तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रभावी कामगिरी केली.
या कुस्ती स्पर्धेत पायल गजधर राम हिने १९ वर्षांखालील गटात ५५ किलो वजन गटात प्रथम क्रमांक मिळवला. याच वयोगटात ५७ किलो वजन गटामध्ये पूजा निवृत्ती शिखरे हिने दुसरा क्रमांक संपादन केला. १७ वर्षांखालील गटात सिद्धी प्रकाश हिरे हिने ५७ किलो वजन गटात दुसरा क्रमांक पटकावला.
या खेळाडूंना क्रीडा प्रमुख अमित झारकर, विजया गाडगे आणि देवचंद नेहे यांनी मार्गदर्शन केले. त्यांच्या यशाबद्दल अध्यक्ष अनिल तांबे आणि इतर मान्यवरांनी, मुख्याध्यापिका राजश्री भालेकर यांनी त्यांचे अभिनंदन केले आणि आगामी स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.