कबड्डी स्पर्धेच्या यशस्वी नियोजनात महिलांचा मोलाचा वाटा !

  • By admin
  • August 31, 2025
  • 0
  • 23 Views
Spread the love

नाशिक ः नाशिक शहरात आयोजित करण्यात आलेल्या कबड्डी स्पर्धेच्या यशस्वी आयोजनात महिलांच्या सक्रिय भूमिकेचा मोलाचा वाटा राहिला आहे.

पहिल्यांदाच कबड्डी राज्य निवड चाचणीचे महिला गटाने त्यांना दिलेली भूमिका व वेगवेगळ्या जबाबदाऱ्या आपापल्या पद्धतीने आयोजन आणि नियोजन केले आहे. सुरेख पद्धतीने या दोन दिवसात कार्यक्रम व स्पर्धा यशस्वी पार पडणे हे केवळ महिलांनी साध्य केले असून नियोजनापासून ते समारोपापर्यंत प्रत्येक जबाबदारी ही विशाखा समितीच्या माध्यमातून महिलांनी पार पाडली आहे

१५ महिला पंच व तांत्रिक समिती सामन्यांचे संचालन केले, तर सांस्कृतिक समितीने महाराष्ट्रीयन पारंपरिक वेशभूषांसह जय घोषणा करीत स्वागत करून आकर्षक गणेश वंदना नृत्य सादर केले. तर कार्यक्रमाचे उद्घाटन व समारोपाचे सूत्रसंचालनाची जबाबदारी देखील पार पाडली आहे.

याशिवाय, महिला स्वयंसेविका, पोस्ट-मीडिया कव्हरेज, फोटोग्राफी, आवश्यक कागद पडताळणी, आरोग्य सेवा, मुली व महिला खेळाडूंसाठी निवास व्यवस्था, भोजन व्यवस्था, वाहतूक व्यवस्था तयारी केली. संपूर्ण अहवाल व समन्वय महिलांनीच केले असून यामुळे कार्यक्षमतेचा व एकता बांधिलकीची प्रेरणास्थान म्हणून महिला गटाला या कार्यक्रमात शोभा आली व महिलांना आपले गुण कौशल्य नुसार आपले कार्य करण्याची संधी क्रीडा भारती व हौशी कबड्डी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य निवड चाचणी या स्पर्धा व कार्यक्रमातून महिलांना उत्कृष्ट काम करण्याची संधी मिळाली आहे.

कार्यक्रमाचे महिला नेतृत्व करणारे क्रीडा भारतीच्या मंजिरी पाटील, पंचप्रमुख लता ढिकले, विशाखा समिती प्रमुख काजल जठार, स्वयंसेविका प्रमुख करिष्मा सोनार , कार्यक्रमाचे सूत्रसंचालिका आरती बोराडे , कार्यक्रम आयोजन व नियोजन महिला नेतृत्व प्रतिनिधी कामिनी केवट व कार्यक्रमाचे मार्गदर्शक भारती जगताप, सचिव अ‍ॅमेच्युअर कबड्डी फाउंडेशन महाराष्ट्र यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम संपन्न झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *