
सोलापूर ः मराठा समाज सेवा मंडळ संचलित छत्रपती शिवाजी सायं कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय व सोलापूर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने क्रीडा दिनानिमित्त सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळविणाऱ्या खेळाडू, मार्गदर्शक व संघटक यांचा गौरव करण्यात आला.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे माजी क्रीडा संचालक डॉ सुरेश पवार, जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार, जिल्हा मुख्य कार्यकारी क्रीडा अधिकारी दत्तात्रय वरकड यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला. यावेळी प्राचार्य डॉ अरुण मित्रगोत्री, प्राचार्य मंजुश्री पाटील आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रा. सचिन गायकवाड यांनी केले. सूत्रसंचालन प्रा युवराज सुरवसे यांनी केले. प्रा संतोष गवळी यांनी अतिथींचे स्वागत केले.
सत्कारमूर्ती राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू
साईराज हनमे, श्रेया परदेशी, सिद्धार्थ साखरे, प्रेरणा हरिदास, रमेश दोडमणी, सोहेल पठाण , अक्षय हावळे, गौरी गुंड, श्रावणी सुपाते, अथर्व पोद्दार.
मार्गदर्शक व संघटक : हरिदास रणदिवे , दीपक चिकणे (आर्चरी), महेश झांबरे (टेनिस), संगीता जाधव (कराटे ),अनिल गिराम (व्हॉलीबॉल), मरगू जाधव (कबड्डी), डॉ अशोक पाटील (ॲथलेटिक्स ), गोकुळ कांबळे (खोखो), प्रा संतोष खेडे (बेसबॉल), सुहास छंचुरे ( बॉल बॅडमिंटन), प्रमोद चुंगे (टेनिस क्रिकेट).