संभाजीनगर येथे बुधवारी आंतर शालेय खो-खो स्पर्धा

  • By admin
  • September 1, 2025
  • 0
  • 15 Views
Spread the love

छत्रपती संभाजीनगर ः छत्रपती संभाजीनगर जिल्हा खो-खो असोसिएशन यांच्या विद्यमाने शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांच्या संकल्पनेतून भारतीय मैदानी खेळाचा प्रचार व प्रसार व्हावा म्हणून अमोल साळवे यांच्या सहकार्याने वयोगट १७ वर्षांखालील आंतर शालेय मुले-मुली खो-खो स्पर्धेचे आयोजन ३ सप्टेंबर रोजी जिल्हा परिषद मैदान, विसर्जन विहिरीजवळ, औरंगपुरा येथे आयोजित करण्यात आले आहे.

बुधवारी जिल्हा परिषद मैदान औरंगपुरा येथे आयोजित वयोगट १७ वर्षाखालील आंतर शालेय मुले-मुली खो-खो स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शाळांना प्रवेश असेल. इतर कुठल्याही क्रीडा मंडळांना प्रवेश नसेल. स्पर्धा निशुल्क असून छत्रपती संभाजीनगर शाळांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन छत्रपती संभाजीनगर जिल्हा खो-खो असोसिएशन अध्यक्ष समीर मुळे, कार्याध्यक्ष बालाजी सगर किल्लारीकर, जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ, भारतीय खो-खो महासंघाचे तसेच महाराष्ट्र खो-खो असोसिएशन खजिनदार गोविंद शर्मा, छत्रपती संभाजीनगर जिल्हा खो-खो असोसिएशन उपाध्यक्ष ऋषिकेश जैस्वाल, सारिका भंडारी, अमोल साळवे, छत्रपती संभाजीनगर जिल्हा खो-खो असोसिएशन सचिव विकास सूर्यवंशी, सहसचिव भारती काकडे, अभयकुमार नंदन, श्रीपाद लोहकरे, विनायक राऊत, आशिष कान्हेड, मनोज गायकवाड यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी राहुल नाईकनवरे ९५२७८८३५४६, वरद कचरे ८४२१५६६२९९ यांच्याशी संपर्क साधावा. आपला प्रवेश २ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी ७ वाजेपर्यंत निश्चित करावा जेणेकरून स्पर्धेत सहभागी होता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *