
यवतमाळ ः उमरी तालुक्यातील पांढरकवडा येथील डॉ यार्डी इंग्लिश मीडियम स्कूल येथे हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिवसानिमित्त विविध क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेमध्ये फुटबॉल, सॉफ्टबॉल, बेसबॉल, स्टंप थ्रो क्रिकेट, थ्री लेग रेस, १०० मीटर रनिंग, बॅलन्स कोण अशा विविध मजेदार खेळ व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य सेलास्टीन सेलवा राजा व प्रमुख अतिथी म्हणून शाळेच्या व्यवस्थापिका शिल्पा दिपू अब्राहम या होत्या. कार्यक्रमाची सुरुवात शाळेचा ध्वज स्पोर्ट्स कॅप्टन महिका दुबेच्या हातून ध्वजारोहण करण्यात आले त्यानंतर डेप्युटी हेड बॉय समर्थ कैलासवार याने विद्यार्थ्यांना पुढील होणाऱ्या स्पर्धेकरिता सर्व विद्यार्थ्यांना आपण क्रीडा स्पर्धेत खेळत असताना प्रामाणिकपणे खेळण्याची शपथ दिली.
शाळेची स्पोर्ट्स कॅप्टन महिका दुबे हिने हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या कारकिर्दीबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर राष्ट्रीय क्रीडा दिवस निमित्त घेण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये विजय खेळाडूंना पारितोषिक व सर्टिफिकेट देऊन गौरविण्यात आले.
प्राचार्यांनी खेळ व खेळातील महत्त्व फिटनेस शिस्त व नियमांचे पालन करणे याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली. राष्ट्रीय व राज्यस्तरीय स्पर्धेत प्राविण्य प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. त्यामध्ये सॉफ्टबॉल, बेसबॉल, बॅडमिंटन, अॅथलेटिक्स, क्रिकेट या खेळांमध्ये प्राविण्य प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले.
य कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आशिष सिडाम यांनी केले. सारा यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्याकरीता क्रीडा शिक्षक व राष्ट्रीय खेळाडू गौरव ढवक, आशिष सिडाम, अश्विन राठोड, राहुल चव्हाण, जॉन रुकडीकर, गिरीश वैद्य व सर्व शिक्षक वृंद कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.