
परभणी ः परभणी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय वतीने राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा उत्साहात साजरा करण्यात आला.
मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त योगा, टेबल टेनिस, सर्कल कबड्डी, बास्केटबॉल, स्केटिंग, रोप स्किपिंग अशा विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी गीता साखरे, जिल्हा क्रीडा संकुल समिती सदस्य गणेश माळवे, राज्य क्रीडा मार्गदर्शक संजय मुंढे, तालुका क्रीडा अधिकारी कल्याण पोले, क्रीडा अधिकारी सुयश नाटकर, रोहन औढेकर, कार्यालय अधिक्षक रमेश खुणे,दुधारे पंडित, धीरज नाईकवाडे, क्रीडा शिक्षक उपस्थित होते.
मेजर ध्यानचंद यांच्या विषयी व शासकीय योजनांविषयी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी गीता साखरे, गणेश माळवे यांनी दिली. खेळाडूंना “हर गली हर मैदान खेले सारा हिंदुस्थान”, एक तास मैदानावर खेळायला यावे या विषयावर राज्य क्रीडा मार्गदर्शक संजय मुंढे यांनी मार्गदर्शन केले. खेळाडूंना क्रीडा शपथ क्रीडा अधिकारी सुयश नाटकर यांनी दिली.