
तुळजापूर ः शिक्षण प्रसारक मंडळ अणदूर संचलित श्री कुलस्वामिनी विद्यालय तुळजापूर या विद्यालयातील दिव्यदर्शनी सुरज ढेरे या विद्यार्थिनींनी चौदा वर्षे वयोगटाच्या तालुकास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळवला.
या कामगिरीमुळे तिची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तिला क्रीडा शिक्षक अनिल धोत्रे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. तिचे व अनिल धोत्रे यांचे संस्थेचे सचिव रामचंद्र (दादा )आलुरे, ज्येष्ठ विधीज्ञ लक्ष्मीकांत पाटील, ॲड नागनाथ कानडे, विद्यालयाचे मुख्याध्यापक राजकुमार ठोंबरे, सिद्धेश्वर कबाडे, दिलीप भालेराव, राजू ससाणे, धनाजी राऊत, प्रदीप बिरादार, बालाजी कोणे, यांनी अभिनंदन केले व पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.