पुणे येथे मंगळवारपासून ट्रिनिटी गोल्फ चॅम्पियन्स लीग रंगणार

  • By admin
  • September 1, 2025
  • 0
  • 11 Views
Spread the love

कपिल देव यांच्या पुढाकाराने आठ संघात नामवंत गोल्फपटूंचा सहभाग

पुणे ः भारतीय विश्वचषक संघाचे कर्णधार कपिल देव यांच्या पुढाकाराने व्यावसायिक व हौशी गोल्फ पटूंसह विविध क्षेत्रातील नामवंतांचा सहभाग असलेल्या ट्रिनिटी गोल्फ चॅम्पियन्स लीग (टीजीसीएल) या आगळ्यावेगळ्या सांघिक गोल्फ स्पर्धेचे आयोजन पुण्यातील लवळे येथील ऑक्सफर्ड गोल्फ कोर्स येथे २ ते ६ सप्टेंबर दरम्यान करण्यात आले आहे.

संपूर्ण देशभरात गोल्फचा विकास व प्रचार करण्यासाठी तसेच स्पर्धात्मक दर्जा उंचावण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याचे कपिल देव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी मुरली कार्तिक,  गौरव घेई, मानव जैनी, ईशान डिसुझा आदी मान्यवर उपस्थित होते.  

स्पर्धेचा आगळा फॉरमॅट
या स्पर्धेत भारतातील सात शहरांसह एका आंतरराष्ट्रीय शहराचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आठ संघांचा समावेश असून प्रत्येक संघात 20 खेळाडूंचा सहभाग असणार आहे.

विशेष प्रकारची हॅंडीकॅप सिस्टीम
या लीग स्पर्धेत व्यावसायिक व हौशी खेळाडूंना समान संधी मिळावी, यासाठी विशिष्ट प्रकारची हॅंडीकॅप पद्धत अमलात आणण्यात येणार आहे. यामध्ये ० ते ५, ६ ते १०, ११ ते १४ आणि १५ ते १८ अशा चार हॅंडीकॅप गटांचा समावेश आहे. व्यावसायिक खेळाडू आपल्या वेगळ्या गटात खेळणार आहेत. तरीही प्रत्येक संघाच्या यशात हौशी व व्यावसायिक खेळाडूंना समान वाटा उचलता येणार आहे.

रायडर कपच्या धर्तीवर आयोजन
या स्पर्धेचे आयोजन जगातील अग्रगण्य अशा रायडर कप स्पर्धेच्या धर्तीवर करण्यात आले आहे. यामध्ये बेटर बॉल, अल्टरनेट शॉट, एकेरी सामने अशा गटांचा समावेश आहे.

साखळी स्पर्धेत चार फेऱ्यांचा समावेश असून पहिली व तिसरी फेरी बेटर बॉल मॅच प्ले पद्धतीने, तर दुसरी फेरी अल्टरनेट शॉर्ट पद्धतीने खेळली जाणार आहे. चौथी फेरी पहिल्या व तिसऱ्या फेरीतील सरस खेळाडूंमध्ये होणार आहे. प्रत्येक संघात दोन व्यावसायिक महिला खेळाडू असणे बंधनकारक आहे. तेच एक व्यावसायिक व्यावसायिक गोल्फपटू असणाऱ्या सेलिब्रेटीचा समावेश असणे आवश्यक आहे.

या आठ संघांची विभागणी प्रत्येकी चार संघ अशी दोन गटात करण्यात येणार असून साखळी स्पर्धेत सर्व संघ एकमेकांशी लढणार आहेत. दोन्ही गटातील आवळी संघांमध्ये अंतिम लढत रंगणार आहे. तिसऱ्या व चौथ्या स्थानासाठी प्रत्येक गटातील दुसरा क्रमांक चे संघ एकमेकांशी लढणार आहे.

स्पर्धेत विश्वसमुद्रा गोल्डन ईगल्स, दक्षिण रेंजर्स, चंदीगड टायटन्स, गोल्फ कोड, मुंबई वॉरियर्स, दुगस्त्य टायटन्स-दुबई, मराठा मुल्लीगंन्स, वेव्ह रायडर्स हे ८ संघ झुंजणार आहेत. स्पर्धेत विश्वसमुद्रा गोल्डन ईगल्समध्ये गगनजीत भुल्लर, करणदीप कोचर, रिधिमा दिलावरी, दक्षिण रेंजर्समध्ये करुण नायर,दुगस्त्य टायटन्स-दुबईमध्ये मुरली कार्तिक, मुंबई वॉरियर्समध्ये खलिन जोशी व अंगद चिमा, वेव्ह रायडर्समध्ये विधात्री उर्स व भारतीय हॉकीपटू जाफर इकबाल, चंदीगढ टायटन्समध्ये क्षितिज नावेद कौल व अभिनव लोहान, गोल्फ कोडमध्ये हिताशी बक्षी व सचिन बैसोया यांसारखे नामांकित अव्वल खेळाडू आपले कौशल्य पणाला लावणार आहेत.       

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *