
छत्रपती संभाजीनगर ः ऑल महाराष्ट्र थांग-ता असोसिएशन संलग्नित थांग-ता असोसिएशन ऑफ छत्रपती संभाजीनगरतर्फे ३ सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर जिल्हास्तरीय थांग-ता मार्शल आर्ट्स चॅम्पियनशिप आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती सचिव प्रवीण अव्हाळे यांनी दिली.
छत्रपती संभाजीनगर जिल्हास्तरीय थांग-ता मार्शल आर्ट्स चॅम्पियनशिप स्पर्धा सातारा परिसरातील सोहम इंग्लिश स्कूल या ठिकाणी बुधवारी होणार आहे. या स्पर्धेत अधिकाधिक खेळाडूंनी सहभाग घ्यावा असे आवाहन संयोजक प्रवीण अव्हाळे, संदीप लघामे पाटील, रामेश्वर चायल, संतोष अव्हाळे, प्रवीण राऊत यांनी केले आहे.