परभणीत लवकरच खासदार क्रीडा महोत्सव ः संजय जाधव

  • By admin
  • September 2, 2025
  • 0
  • 20 Views
Spread the love

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त खेळाडूंचा सत्कार 

परभणी ः परभणी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने हॉकीचे जादुगार मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिन व राष्ट्रीय क्रीडा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने सन २०२४-२५ व २०२५-२६ या वर्षामध्ये ज्या खेळाडूंनी शालेय क्रीडा स्पर्धा / मान्यता प्राप्त संघटनेच्या क्रीडा स्पर्धा / अखिल भारतीय आंतर विद्यापीठ क्रीडा स्पर्धेमध्ये आंतरराष्ट्रीय/राष्ट्रीय पातळीवर पदक मिळविले आहे अशा खेळाडूंचा सत्कार खासदार संजय जाधव परभणी यांच्या हस्ते जिल्हा क्रीडा संकुल येथे करण्यात आला. 

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्य क्रीडा मार्गदर्शक संजय मुंढे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून टेनिस व्हॉलीबॉलचे राज्य सरचिटणीस गणेश माळवे, राष्ट्रीय बॉक्सिंग प्रशिक्षक धनंजय बनसोडे, प्रदीप लटपटे, चेतन मुक्तावार, तालुका क्रीडा संयोजक किशन भिसे, विलास राठोड यांच्या उपस्थिती होती. या मान्यवरांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.

खासदार संजय जाधव यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, आर्थिकदृष्ट्या गरीब खेळाडूंना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये काही अडचण आल्यास आर्थिक मदत करणार, तसेच परभणी येथे लवकरच भव्य स्वरुपात परभणी खासदार क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच परभणीतील कोणत्याही खेळाडूंना काहीही अडचण निर्माण झाल्यास मी सदैव त्यांच्या पाठीशी उभा आहे. परभणीचा जागतिकस्तरावर नावलौकीक करण्याकरीता जे काही प्रयत्न करता येतील त्याकरीता खेळाडू व त्यांच्या मार्गदर्शकांच्या पाठीशी उभा आहे याची ग्वाही खासदार संजय जाधव यांनी दिली. 

अध्यक्षीय समारोप संजय मुंढे यांनी केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर ढोके यांनी केले. प्रास्ताविक कल्याण पोले यांनी केले. क्रीडा अधिकारी सुयश नाटकर यांनी आभार मानले.

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय खेळाडू

रमन सिंगीतम, शेख जुनेद, गायत्री वाघ, पल्लवी पितळे, नितीन खटिंग, ओंकार बाराहाते, गजानन बालटकर, ज्ञानेश्वर कावळे, अनिकेत चिद्रवार, यश चव्हाण, प्रदीप जाधव, पायल आडे, जीवन जाधव, गोविंद जाधव, आराधना ताटे, गौरी शिंदे, शामबाला नांदखेडकर, वैभव खुणे, वैभव रोडगे, अदिबा रोडगे, दिव्या एन्डायत, जितेश भिसे, मानसी कुलकर्णी, संभाजी देशमुख, दिव्या आव्हाड, अदित्य खळीकर, आरती चव्हाण, विठ्ठल बोरसे, कृष्णा डोल्हारकर, श्रेया डोल्हारकर, कैलास जाधव, मोनाली धनगर, रुखय्या शेख, सिध्दी कांबळे, तनिष्का डापकर, राजश्री सहजराव, श्रवणी पुंडगे, पुनम गोधम, अभिमन्यु कोटकवार, सायमा सय्यद, तेजश्री नागुला, पार्थ शिंदे, प्रज्वल अंभोरे, प्रेम कटारे, हर्षद जाठोडे, प्रथमेश कटारे, अमर काळदाते, प्रज्ञेश बाचावार, हिमांशु अंभोरे, योगेश्वरी पारधे, अनिल शिंदगे, श्रीसाई बोराडे, दिग्विजय पाते या खेळाडूंचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

जिल्हा क्रीडा अधिकारी गीता साखरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता तालुका क्रीडा अधिकारी कल्याण पोले, राज्य क्रीडा मार्गदर्शक संजय मुंढे, क्रीडा अधिकारी सुयश नाटकर, मुख्य लिपीक रमेश खुणे, धीरज नाईकवाडे, प्रकाश पंडित, योगेश आदमे, भागवत दुधारे यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *