
सात सप्टेंबर रोजी आयोजन
मुंबई ः येत्या सात सप्टेंबर रोजी घाटकोपर जॉली जिमखान्याच्या वतीने प्रथमच आंतर क्लब व्हॉलीबाल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेत यजमान घाटकोपर जॉली जिमखाना, पीजे हिंदू जिमखाना, चेंबूर जिमखाना, एनएससीआय हे बडे क्लब सहभागी होत आहेत. स्पर्धेतील सामने साखळी व नंतर बाद पद्धत या पद्धतीने घेण्यात येतील. सहभागी क्लबकडून कुठली ही फी घेण्यात येणार नाही. स्पर्धेतील विजेत्या,उपविजेत्या संघाना चषक, तसेच रोख रक्कमेची पारितोषिके देण्यात येतील. तसेच सर्वोत्तम खेळाडूंना देखील खास बक्षिसे देण्यात येतील.