राष्ट्रीय सेवा योजना व्यक्तिमत्व घडविण्याचे उत्तम व्यासपीठ – डॉ नितीन घोरपडे

  • By admin
  • September 3, 2025
  • 0
  • 45 Views
Spread the love

पुणे ः अण्णासाहेब मगर महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या नवीन स्वयंसेवकांसाठी उद्बोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना एनएसएसचे महत्त्व, उद्दिष्टे आणि सामाजिक कार्याची भूमिका याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. 

या प्रसंगी ‘आपल्यामध्ये असलेल्या सुप्त गुणांना ओळखून स्वत: चे व्यक्तिमत्त्व आणि उत्तम माणूस बनविण्याचे व्यासपीठ म्हणजे राष्ट्रीय सेवा योजना, असे मत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ नितीन घोरपडे यांनी व्यक्त केले. यावेळी एनएसएसच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. स्वच्छता अभियान, रक्तदान शिबीर, वृक्षारोपण, आपत्कालीन मदत अशा अनेक समाजोपयोगी कामांमध्ये एनएसएस स्वयंसेवक सक्रिय सहभाग घेतात. तसेच, या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व क्षमता, टीमवर्क आणि सामाजिक जाणीव वाढीस लागते, असेही त्यांनी सांगितले.

पुणे जिल्हा समन्वयक आणि राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ सविता कुलकर्णी यांनी नॉट मी, बट यू या एनएसएसच्या ब्रीदवाक्याचे महत्त्व सांगून समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी आणि एक जबाबदार नागरिक म्हणून आपले कर्तव्य बजावण्यासाठी एनएसएस कशी मदत करू शकते, यावर त्यांनी भर दिला. यातून विद्यार्थ्यांना राष्ट्रीय पातळीवरील शिबिरापर्यंत जाण्याची संधी मिळते हेही सांगितले.

डॉ नितीन घोरपडे सरांची प्राचार्य पदाची १७ वर्षे पूर्ण झाली. याचे औचित्य साधून राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. या उद्बोधन कार्यक्रमामुळे नव्या विद्यार्थ्यांना एनएसएसच्या कार्याची सखोल माहिती मिळाली. या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी कार्यक्रम अधिकारी प्रा हृषिकेश मोरे, तसेच डॉ शैला धोत्रे, प्रा सविता भुजबळ, डॉ वंदना सोनवले, प्रा शीतल गायकवाड, प्रा अर्चना श्रीचीप्पा, प्रा महेश्वरी जाधव, प्रा कर्डिले आदी उपस्थित होते. डॉ वंदना सोनवले यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *