
पुणे ः व्हिक्टोरियस चेस अकादमी, रिलायन्स मॉल, एरंडवणे आणि आरंभ बँक्वेट पार्टी प्ले’सी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘६ रविवार रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा सिरीज’चा पाचवा टप्पा उत्साहात पार पडला.
या स्पर्धेत १३६ बुद्धिबळपटूंनी विविध वयोगटांतून सहभाग घेतला होता. नेहमीप्रमाणेच रिलायन्स मॉल, एरंडवणे, आरंभ बँक्वेट पार्टी प्ले’सी हे केंद्रस्थानी, प्रशस्त आणि आकर्षक ठिकाण असल्याने खेळाडू व प्रेक्षकांसाठी सोयीस्कर आणि प्रेरणादायी वातावरण उपलब्ध झाले.
या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून आंतरराष्ट्रीय आर्बिटर नितीन शेणवी, व्हिक्टोरियस चेस अकादमी संस्थापक व संचालक कपिल लोहाना, तज्ज्ञ अभियंता पुष्कराज बेडेकर, एरंडवणे रिलायन्स मॉलचे व्यवस्थापक प्रतीक वखारिया यांची उपस्थिती होती.
बुद्धिबळातील बुद्धिमत्ता, शिस्त आणि खेळाडूवृत्तीचा सुंदर संगम थरारक समाप्ती, हुशार डावपेच आणि परस्पर सन्मान या सर्वांनी पाचव्या टप्प्याला अविस्मरणीय बनवले. आठवड्यानंतर आठवडा वाढणारा सहभाग आणि उत्साह या स्पर्धा मालिकेच्या यशाची ग्वाही देतो. विक्टोरियस चेस अकॅडमीतर्फे सर्व विजेते आणि सहभागींचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले. तसेच रिलायन्स मॉल, एरंडवणे आणि आरंभ बँक्वेट पार्टी प्ले’सी यांचे बुद्धिबळाच्या प्रसारासाठी दिलेल्या सातत्यपूर्ण सहकार्याबद्दल आभार व्यक्त करण्यात आले.
स्पर्धेचा अंतिम निकाल
ओपन गट ः १. एस वीरेश, २. एस श्लोक, ३. प्रथमेश शेर्ला.
१५ वर्षांखालील गट ः १. अर्णव कदम, २. अयान सोमाणी, ३. परम समीर जालना.
१३ वर्षांखालील गट ः १. शंकर स्वराज, २. अभिजय अनिरुद्ध वाळवेकर, ३. युग विशाल बर्दिया.
११ वर्षांखालील गट ः १. अविरत चौहान, २. शितिज प्रसाद, ३. इशान अर्जुन पी वाई.
९ वर्षांखालील गट ः १. रेड्डी हेयान, २. निवान अग्रवाल, ३. आरव अमोल चौधरी.
७ वर्षाखालील गट ः १. प्रीतिका नंदी, २. अवयांश जिंदाल, ३. गर्ग चिरक्ष तरुण.
सर्वोत्तम व्हीसीए खेळाडू ः १. ओम दयानंद रामगुडे, २. तेलंग यशवंत, ३. प्रथम अमित वारंग.
सर्वोत्तम महिला खेळाडू ः १. निहिरा कौल, २. श्रावणी उंडाळे, ३. शाह माहेर.
श्रेष्ठ ज्येष्ठ खेळाडू ः १. सुनील वैद्य.