राज्य तलवारबाजी स्पर्धेत नागपूरच्या खेळाडूंचे वर्चस्व 

  • By admin
  • September 3, 2025
  • 0
  • 97 Views
Spread the love

वैष्णवी बेडवालची राष्ट्रीय स्पर्धेसाठी वैयक्तिक पदक विजेती म्हणून निवड

नागपूर ः छत्रपती संभाजीनगर येथे नुकत्याच आयोजित राज्यस्तरीय कॅडेट तलवारबाजी स्पर्धेत नागपूरच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली आणि एकूण ३ पदके जिंकली आणि संपूर्ण क्रीडा स्पर्धेत चमकदार कामगिरी करून नागपूरचे नाव उंचावले.

या स्पर्धेत वैष्णवी बेडवाल हिने सेबर इव्हेंटमध्ये वैयक्तिक सुवर्णपदक जिंकून राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात आपले नाव निश्चित केले. फॉइल प्रकारात मुलींच्या संघाने कांस्य पदक पटकावले. या संघात आशना चौधरी, ईशा यावरी, इतिश्री हटवार, श्रावणी मोझरकर या खेळाडूंचा समावेश आहे. तसेच सेबर प्रकारात मुलींचा संघ कांस्य पदकाचा मानकरी ठरला. या संघात वैष्णवी बेडवाल, सान्वी नोडिंग, धुर्वा बाराई व अवनी बनकर या खेळाडूंचा समावेश आहे. 

सर्व खेळाडूंनी आपल्या यशाचे श्रेय त्यांचे पालक आणि त्यांचे प्रशिक्षक अंकित गजभिये, राहुल मांडोकर, सागर भगत, आवेश सोमकुंवर, यश सोनटक्के आणि मोनल बागडे यांना दिले. यावेळी नागपूर जिल्हा तलवारबाजी संघटनेचे अध्यक्ष अजय सोनटक्के, सचिव मोहम्मद शोएब व खजिनदार सुरेश हजारे यांनी सर्व खेळाडूंचे यशाबद्दल अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *