
मुंबई ः युवा फुटबॉल खेळाडूंसाठी आयोजित करण्यात आलेल्या बारा वर्षांखालील आंतर क्लब फुटबॉल स्पर्धेत यजमान घाटकोपर जॉली जिमखाना फुटबॉल संघाने विजेतेपद पटकावले.
अंतिम फेरीत त्यांनी रायजिंग स्टार फुटबॉल क्लबचा २-१ अशा गोल फरकांनी पराभव केला. विजयी संघाच्या ध्यान मावानी, मितनेष जैन यांनी गोल केले. पराभूत संघाच्या अहमद करोडियाने एक गोल केला. ध्यान मावानीला स्पर्धेत सर्वोत्तम खेळाडूचा मान मिळवला. तर ए शेख याची सर्वोत्तम गोलरक्षक म्हणून निवड करण्यात आली.