
जळगाव ः जळगाव शहरातील रहिवासी व केसीई संचलित शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी, अनुभूती स्कूल येथे कार्यरत क्रीडा शिक्षक आणि आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ खेळाडू आकाश अशोक धनगर यांनी नुकतीच सेट परीक्षा उत्तीर्ण केली आहे.
युजीसी, नवी दिल्ली यांच्या मार्गदर्शनातून सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे यांच्यावतीने सहाय्यक प्राध्यापक पदासाठी १५ जून २०२५ रोजी घेण्यात आलेली राज्य पात्रता परीक्षा आकाश धनगर यांनी शारीरिक शिक्षण या विषयात उत्तीर्ण केली आहे.
याकामी त्यांना केसीई सोसायटीचे शिक्षणशास्त्र आणि शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अशोक राणे, उपप्राचार्य प्रा केतन चौधरी, विभाग प्रमुख प्रा प्रवीण कोल्हे, मुळजी जेठा महाविद्यायाचे क्रीडा संचालक डॉ श्रीकृष्ण बेलोरकर यांचे मार्गदर्शन लाभले असून या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.