
धुळे ः पुणे येथील बालेवाडी क्रीडा संकुलात सुरू असलेल्या ३९व्या महाराष्ट्र ॲथलेटिक्स राज्यस्तरीय स्पर्धेत १६ वर्षांखालील मुलींमध्ये धुळे जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन आणि रॉयल फिटनेस क्लबची खेळाडू संतोषी पिंपळासे हिने सुवर्णपदक पटकावले.
संतोषीला प्रशिक्षक प्रमोद पाटील यांच्या मार्गदर्शन लाभले आहे. संतोषी ही प्रमोद पाटील यांच्या मार्गदर्शनात नियमित सराव करते. संतोषी पिंपळासे हिने ६०० मीटर धावणे बेस्ट परफॉर्मन्स करत (नोंदविलेली वेळ १:३५) सुवर्ण पदक पटकावले.
धुळे येथील कमलाबाई अजमेरा हायस्कूल येथे १० वी वर्गात शिक्षण घेत आहे. भोपाळ येथे होणाऱ्या वेस्ट झोन राष्ट्रीय स्पर्धसाठी निवड झाली आहे. तिच्या यशाबद्दल असोसिएशनचे अध्यक्ष राजवर्धन कदमबांडे, क्रीडा अधिकारी एम के पाटील, सचिव प्रा नरेंद्र पाटील, कोषाध्यक्ष हेमंत भदाणे, विश्वास पाटील, सुखदेव महाले यांनी तिचे अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.