
अंबाजोगाई ः दरवर्षी प्रमाणे याही वर्षी सरस्वती गणेश मंडळाने शुमा क्रिकेट अकॅडमीच्या ठिकाणी मुगदर हे पारंपरिक भारतीय व्यायाम साधन उपलब्ध करुन दिले आहे.
प्राचीन काळापासून आखाड्यांमध्ये कुस्तीपटू आणि खेळाडू आपली शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी या मुगदरचा वापर करतात. त्यातून खांदे, हात, छाती, पाठीचा भाग आणि कोर मजबूत होतो. ह्या व्यायामाला “मुगदर असे म्हणतात हा मुगदर व्यायामासाठी विशेष उपयुक्त आहे. मुगदर या फिटनेसचे प्रशिक्षक आदित्य लोढा यांनी खेळाडूंना प्रात्यक्षिक करून दाखवली व खेळाडूंकडून त्याचा सराव करून घेतला.
आदित्य लोढा यांच्या मते खेळाडूंनी खेळ खेळत असताना फिटनेसकडे विशेष लक्ष द्यावे आणि हे खूप महत्वाचे आहे. फिटनेसमुळे खेळाडूंची खेळातील गुणवत्ता सिद्ध होत असते. त्यानंतर शुमा क्रिकेट अकॅडमी या ठिकाणी गणपतीची आरती करून योग गुरू पांचाळ सर यांनी योगाचे धडे मुलांना दिले. योगगुरू पांचाळ यांच्या मते खेळाडूंनी खेळ खेळताना योग्य आहार घेणे आवश्यक आहे.
या वेळी सरस्वती गणेश मंडळाचे योगेश परदेशी, कमलेश परदेसी, अश्विन परदेशी, आकाश मोदी, निलेश मुथा, निहाल परदेशी, अमित परदेशी, राहुल मोदी, हर्ष परदेशी आदी मान्यवर उपस्थित होते. शुमा क्रिकेट अकॅडमीचे प्रशिक्षक सुरज कांबळे, समाधान ओव्हाळ यांची उपस्थिती होती.