
छत्रपती संभाजीनगर ः मुंबई येथे नुकत्याच झालेल्या स्पेशल ऑलिम्पिक भारतच्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत एमपीपी स्पोर्ट्स पार्कच्या जलतरणपटूंनी चमकदार कामगिरी नोंदवत लक्षवेधक यश संपादन केले.
या स्पर्धेत कांचन बडवे मुलींची प्रशिक्षक व सागर बडवे तांत्रिक अधिकारी होते. तसेच अहिल्यानगर येथे झालेल्या स्पर्धेत संस्कृती, सई, अर्णव, शिवानंद, साई, अंश, ओम, राम, ज्ञानदा या १० स्पर्धकांनी भाग घेतला. एकूण ७ सुवर्ण, २३ रौप्य, १० कांस्य अशी ३० पदके जिंकली. कांचन व सागरने तांत्रिक अधिकारी म्हणून काम केले.
छत्रपती संभाजीनगर येथे सिद्धार्थ जलतरण तलावावर झालेल्या स्पर्धेत राम, सई, गणेश, अंश, शाश्वत, अर्णव, शिवानंद, संस्कृती, सद्गुरू, श्रीवल्लभ, ज्ञानदा, दिगंबर, करण या १६ मुलांनी भाग घेतला व एकूण १० सुवर्ण, ६ रौप्य व ८ कांस्यपदके जिंकली. कांचन व सागरने तांत्रिक अधिकारी म्हणून काम केले.
बारामती येथे झालेल्या राज्यस्तरीय आंतर क्लब स्पर्धेत संस्कृती, ओम, शिवानंद, अर्णव या ४ मुलांनी भाग घेतला. १ सुवर्ण, ३ रौप्य व ४ कांस्यपदके जिंकली. एमजीएम जलतरण तलावावर राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्ताने झालेल्या स्पर्धेत करण, गणेश, श्रेयस, रुद्रांक्ष, राम, सई, गणेश, अंश, अर्णव, संस्कृती, सद्गुरू, श्रीवल्लभ, दिगंबर, रुद्रांक्ष या १४ मुलांनी भाग घेऊन ५ सुवर्ण, १० रौप्य, ५ कांस्य पदके जिंकली. कांचन व सागरने तांत्रिक अधिकारी म्हणून काम केले.
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित क्रीडा भारतीतर्फे झालेल्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या सत्कार समारंभात सागर व दोन विद्याथी हरीश दिगंबर यांचा सन्मान झाला. मागील वर्षीच्या मुलांना आता पदके मिळवण्याची सवय झालीच आहे पण त्याच्यापासून प्रेरणा घेऊन या वर्षी शिकलेल्या मुलांनी ही पदके मिळवण्यास सुरुवात केली आहे.
यासर्वांना शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त एनआयएस प्रशिक्षक सागर बडवे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. ही मुले हिमायत बागेतील एमपीपी स्पोर्ट्स पार्क येथे नियमित प्रशिक्षण घेत आहेत. या यशाबद्दल अॅड गोपाल पांडे, विनायक पांडे, डॉ मकरंद जोशी, अॅड संकर्षण जोशी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.