
छत्रपती संभाजीनगर ः पुणे येथे झालेल्या ३९व्या फेडरेशन स्टेट अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत छत्रपती संभाजीनगरचा धावपटू हर्ष प्रमोद पाटील याने विक्रमी कामगिरी नोंदवत स्पर्धा गाजवली.
शिवछत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बालेवाडी पुणे येथे ही स्पर्धा नुकतीच झाली. अंडर १६ गटात ६० मीटर स्प्रिंट प्रकारात धावताना हर्ष प्रमोद पाटील याने महाराष्ट्र स्टेटचा ७.१० हा विक्रम तोडून ६.९९ असा नवीन रेकॉर्ड स्वतःच्या नावावर केला आहे. तसेच ८० मीटर हर्ल्डल्सचा १०.६० रेकॉर्ड तोडून हर्ष पाटीलने १०.३८ हा नवीन विक्रम नोंदवला आहे.
हर्ष पाटील हा छत्रपती संभाजीनगरचा क्रीडा प्रबोधिनीचा विद्यार्थी असून कलावती चव्हाण माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा शिवाजीनगर येथे इयत्ता दहावीमध्ये शिक्षण घेत आहे. हर्ष पाटीलचे एनआयएस प्रशिक्षक सिद्धार्थ वाघ तसेच क्रीडा प्रबोधिनीच्या प्राचार्य पूनम नवगिरे यांनी हर्षचे अभिनंदन केले आहे.