
छत्रपती संभाजीनगर ः दगडोजीराव देशमुख महाविद्यालयातील शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉ भरतसिंग सलामपुरे यांची भारतीय जनता पक्षाच्या क्रीडा प्रकोष्ट जिल्हा संयोजकपदी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजयजी खंबायते यांनी नियुक्ती केली आहे.
भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, संघटन मंत्री संजय कौडगे तसेच प्रदेश सरचिटणीस आणि आमदार संजय केणेकर यांच्या आदेशाने ही नियुक्ती करण्यात आली. डॉ सलामपुरे यांच्या नियुक्तीचे स्वागत भाजपा शिक्षक आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ संजय सांभाळकर, प्रा भगवान डोके, प्राचार्य डॉ राहुल हजारे, अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षणिक महासंघाचे अध्यक्ष डॉ दिलीप अर्जुने, जिल्हा सचिव राजेंद्र अवतारे, मंडळ अध्यक्ष सुनील राठी, मोहनसिंग सलामपुरे, कैलास जाधव, युवा नेता बिरजू तरैयावाले, प्रा संदीप जगताप आदींनी केले.