
मदर गंगा इंग्लिश स्कूल, राधाबाई शिंदे माध्यमिक विद्यालय अजिंक्य
कन्नड (प्रवीण शिंदे) ः जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर व तालुका क्रीडा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय सॉफ्टबॉल स्पर्धेचे आयोजन तालुका क्रीडा संकुल कन्नड येथे करण्यात आले होते. या स्पर्धेत देवगिरी इंग्लिश स्कूल संघाने अंडर १४ गटात दुहेरी मुकुट पटकावला. मदर गंगा इंग्लिश स्कूल, राधाबाई शिंदे माध्यमिक विद्यालय या संघांनी विजेतेपद पटकावले.
या स्पर्धेला तालुका क्रीडा संकुल समितीचे सदस्य प्रवीण शिंदे व तालुका क्रीडा संयोजक मुक्तानंद गोसावी यांची प्रमुख उपस्थिती होती. या स्पर्धेत एकूण १२ संघानी सहभाग नोंदवला. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विशाल दांडेकर, राहुल दणके, वसीम शेख, अजित खांबट यांनी पुढाकार घेतला होता.
या स्पर्धेत पंच म्हणून राहुल दणके, विशाल दांडेकर, एजाज शहा, वसीम शेख, रविकुमार सोनकांबळे, अजित खांबट यांनी काम पाहिले.
स्पर्धेचा अंतिम निकाल
अंडर १४ मुले ः १. देवगिरी इंग्लिश स्कूल, २. मदर गंगा इंग्लिश स्कूल. मुलींचा गट ः १. देवगिरी इंग्लिश स्कूल, २. सावित्रीबाई फुले कन्या विद्यालय.
अंडर १७ मुले ः १. मदर गंगा इंग्लिश स्कूल, २. देवगिरी इंग्लिश स्कूल. मुलींचा गट ः १. देवगिरी इंग्लिश स्कूल, २. सावित्रीबाई फुले कन्या विद्यालय.
अंडर १९ मुली ः १. राधाबाई शिंदे माध्यमिक विद्यालय हस्ता, २. सावित्रीबाई फुले कन्या विद्यालय कन्नड.