
पहिल्यांदाच अंडर १५ व्हॉलिबॉल संघ चीनमध्ये खेळणार
अहिल्यानगर ः स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या (एसजीएफआय) सुवर्ण इतिहासात पहिल्यांदाच भारताचा शालेय संघ आंतरराष्ट्रीय वर्ल्ड स्कूल व्हॉलिबॉल चॅम्पियनशिप (१५ वर्षांखालील) स्पर्धेसाठी निवडला गेला आहे. ही स्पर्धा चीनमधील शंगलुओ येथे ४ ते १३ डिसेंबर दरम्यान होणार असून या मोहिमेसाठी २३ मुले व २३ मुलींची संभाव्य संघाची निवड करण्यात आली आहे.
पुण्यातील बालेवाडी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये आयोजित निवड चाचणीला देशभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मुलांच्या गटात २७ राज्यांतील तब्बल १९२ खेळाडू, तर मुलींच्या गटात २३ राज्यांतील १६३ खेळाडूंनी गुणवत्ता सिद्ध केली. तज्ज्ञ प्रशिक्षक व तांत्रिक अधिकाऱ्यांनी काटेकोर मूल्यांकन करून अंतिम ४६ जणांची निवड केली.
निवडलेल्या खेळाडूंना लवकरच प्रशिक्षण शिबिरासाठी बोलावले जाणार आहे. यासाठी आवश्यक कागदपत्रे (पासपोर्ट, वयाचा पुरावा, वैद्यकीय प्रमाणपत्र) तातडीने सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
मुलांच्या गटात निवडलेले खेळाडू
कार्तिक सहरावत (उत्तर प्रदेश), आदेश सिंग (विद्या भारती), दक्ष पवनकुमार पटेल (गुजरात), आयुष के सिंग (झारखंड), निशांत खोखर (हरियाणा), अप्रतिम भदौरिया (उत्तर प्रदेश), नेविल कृष्णा मनोज (केरळ), अमन (हरियाणा), सोहम कुमार (गुजरात), मानव बिजू (केरळ), मोहम्मद शाकीर (उत्तर प्रदेश), अटाडा चरण (आंध्र प्रदेश), नासिर अजाज सोफी (जम्मू काश्मीर), गुरू जीवन (राजस्थान), एडविन पॉल सिबी (केरळ), अब्दुल्ला (छत्तीसगड), आर्यन भारद्वाज (उत्तर प्रदेश), राजत धांगर (राजस्थान), मोहित जाट (राजस्थान), अधिज्योतीश्वर पी एस (केरळ), शहाबाद गौतम (पंजाब), पी थरण (पद्दुचेरी), वंश चौधरी (दिल्ली).
मुलींच्या गटात निवडलेल्या खेळाडू
खायाती धांता (हिमाचल प्रदेश), शगुन संदीश वर्मा (कर्नाटक), रूपकथा घोष (पश्चिम बंगाल), महिषा (तामिळनाडू), श्रीनिधी उन्नीकृष्णन (केरळ), सिद्धी दशरथ गायकवाड (महाराष्ट्र), इच्छा (हरियाणा), शारण्य घोष (पश्चिम बंगाल), रागाशी महादेवन (तामिळनाडू), रिया (हिमाचल प्रदेश), अभिषिक्ता पॉल (पश्चिम बंगाल), पूजा राजबंशी (पश्चिम बंगाल), अनिता जाट (राजस्थान), सौमिया डी (तामिळनाडू), अन्वी कनावत (राजस्थान), वैश्णवी सथ्यान (केरळ), कार्तिका चलाकोट (केव्हीएस), प्रीती (हिमाचल प्रदेश), अद्रिका दास (पश्चिम बंगाल), राजल बेन प्रतापभाई वाला (गुजरात), साहेली सामंता (पश्चिम बंगाल), आकांक्षा पांडे (उत्तर प्रदेश), रिंकी देवी (छत्तीसगड).
कोट
भारतीय शालेय क्रीडा क्षेत्रासाठी हा ऐतिहासिक क्षण आहे. पहिल्यांदाच वर्ल्ड स्कूल चॅम्पियनशिपमध्ये आपला संघ उतरणार आहे. या मुला-मुलींच्या प्रयत्नांमुळे भारताचे नाव जागतिक स्तरावर उजळेल.
- दीपक कुमार, अध्यक्ष, ‘एसजीएफआय’