सोलापूर जिल्हा क्रिकेट संघटनेतर्फे शुक्रवारी मुलींची जिल्हास्तरीय निवड चाचणी

  • By admin
  • September 4, 2025
  • 0
  • 16 Views
Spread the love

सोलापूर ः सोलापूर जिल्ह्याचे १५, १७ व १९ वर्षांखालील मुलींचे संघ निवडण्यासाठी येथील इंदिरा गांधी पार्क स्टेडियमवर ५ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते १ व दुपारी २ ते ५.३० या कालावधीत निवड चाचणी होईल. 

सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनकडे रजिस्टर झालेल्या खेळाडूंनी सोबत रजिस्टर कार्ड व शुल्क भरल्याची पावती आणणे बंधनकारक आहे. १५ वर्षांखालील गटासाठी १-९-११ ते ३१-८-२०१४ दरम्यान जन्मलेले, १७ वर्षांखालील गटासाठी १-९-२००८ व १९ वर्षांखालील गटासाठी १-९-२००७ च्या पुढील मुली पात्र आहेत. ही निवड चाचणी चेअरमन किरण मणिहार, स्नेहल जाधव, सारिका कुरनूरकर, मानसी जाधव व राजेंद्र गोटे हे करणार आहेत, असे जिल्हा क्रिकेट संघटनेचे संयुक्त सचिव चंद्रकांत रेम्बर्सु यांनी कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *