
सोलापूर ः सोलापूर जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत खुल्या गटात अग्रमानांकित आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त मानस गायकवाड याने स्पर्धेत सहापैकी सहा गुण प्राप्त करत तर महिला गटात बार्शीच्या सानवी गोरे हिने पाच पैकी साडेचार गुण प्राप्त करत विजेतेपद पटकावले.
खुल्या गटात मानांकित व अनुभवी खेळाडू विशाल पटवर्धन, बार्शीचा मानांकित शंकर साळुंके, पार्थ वलेकर व वेदांत मुसळे यांनी तसेच आंतरराष्ट्रीय खेळाडू स्वराली हातवळणे, सृष्टी गायकवाड व पृथा ठोंबरे यांनी अनुक्रमे द्वितीय, तृतीय व चौथा क्रमांक पटकावत जिल्हा संघातील आपले स्थान निश्चित केले.
मुंबई येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली आहे. १६ वर्षांखालील गटात अमोघ रेवणकर, १२ वर्षांखालील गटात विवान दासरी व ८ वर्षांखालील गटात नियान कंदीकटला यांनी उत्कृष्ट खेळ करत जेतेपद प्राप्त केले.
ग्रँडमास्टर चेस अकॅडमी व सोलापूर चेस अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच सोलापूर डिस्ट्रिक्ट चेस असोसिएशनच्या मान्यतेने शंकर शिवप्पा मस्कले स्मृती चषक स्पर्धा ईरण्णा उपलप मंगल कार्यालय येथे घेण्यात आली. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ स्पर्धेच्या प्रायोजक कस्तुरबाई शंकर मस्कले यांच्या अध्यक्षतेखाली तसेच नामवंत उद्योजक द्वारकाप्रसाद उपलप, संस्थेचे सचिव सुमुख गायकवाड, ग्रँडमास्टर चेस अकॅडमीचे सचिव गणेश मस्कले, विद्या मस्कले, सरस्वती झंपले, शकुंतला माने, दिगंबर मस्के, राष्ट्रीय पंच संतोष पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष पाटील यांनी केले व आभार मानले. विजेत्या खेळाडूंना रोख बक्षिसे, आकर्षक चषक व मेडल्स मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेत मुख्य पंच म्हणून वरिष्ठ राष्टीय पंच उदय वगरे, सहाय्यक राष्ट्रीय पंच रोहिणी तुम्मा, प्रज्वल कोरे, पृथ्वीराज देशमुख, भरत वडीशेरला, गौरव माने, अभिषेक राठोड आदी काम पाहिले. विजेत्या खेळाडूंचे सोलापूर डिस्ट्रिक्ट चेस असोसिएशनचे अध्यक्ष खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, सोलापूरचे अकॅडमीचे अध्यक्ष महेश धाराशिवकर यांनी राज्य स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
अंतिम निकाल
खुला गट : १. मानस गायकवाड, २. विशाल पटवर्धन, ३. शंकर साळुंके, ४. पार्थ वलेकर, ५. वेदांत मुसळे, ६. स्वप्नील हदगल, ७. देवदत्त पटवर्धन, ८. चंद्रशेखर बसरगीकर, ९. वेद आगरकर, १०. नरसिंमा सिंग्रल.
महिला गट : १. सानवी गोरे, २. स्वराली हातवळणे, ३. सृष्टी गायकवाड, ४. पृथा ठोंबरे, ५. सृष्टी मुसळे, ६. श्रावणी देवनपल्ली, ७. रिद्धी उपासे, ८. श्रीनिधी शाबादे, ९. नवीना वडीशेरला, १०. संचिता सोनवणे.
१६ वयोगट : १. अमोघ रेवणवार, २. सिद्धांत चव्हाण, ३. रणवीर पवार, ४. हर्ष हलमल्ली, ५. आरुष कंदले, ६. समर्थ मेकाले, ७. आदिनाथ हावळे, ८. नागेश राजमाने, ९. अनन्या उलभगत, १०. सानिध्य जमादार.
१२ वयोगट : १. विवान दासरी, २. विहान कोंगारी, ३. श्रीरंग पैकेकरी, ४. आयुष गायकवाड, ५. श्रेयश इंगळे, ६. हिमांशू व्हनगावडे, ७. श्रेयश कंदीकटला, ८. नैतिक होटकर, ९. आदित्य कसबे. १०. प्रतीक हलमल्ली.
८ वयोगट : १. नियान कंदीकटला, २. अद्विक ठोंबरे, ३. नमन रंगरेज, ४. आरव चव्हाण, ५. ऋषांक कंदी, ६. रिषभ पामनानी, ७. कृष्णवर्धन कुलकर्णी, ८. ज्ञानदा सांगुळे, ९. स्वरा हंचाटे, १०. रुद्रांश गरड.
उत्तेजनार्थ : अदिती इनानी, पृथ्वीराज मुकाने, सुरेश बनसोडे, भक्त खातेनवरु, तनिष्क तेलगू, स्वराली जाधव, आरव पवार, विहान राठोड, मनन मालानी, श्रेया मस्कले.