
सिंधुदुर्ग ः जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग आयोजित शालेय जिल्हास्तरीय स्क्वॅश स्पर्धेत कासार्डे माध्यमिक विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय कासार्डे विद्यालयातील खेळाडूंनी यावर्षीही बहुतांश गटात विजयी ठरले आहेत.
ही स्पर्धा नुकतीच सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा क्रीडा संकुलात संपन्न झाली. या स्पर्धेत विविध वयोगटात खेळाडूंचा चांगला प्रतिसाद लाभला. या स्पर्धेला पंच म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा स्क्वॅश असोसिएशनचे प्रशिक्षक व पंच विवेक राणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष कामगिरी पार पाडली. या यशस्वी खेळाडूचे जिल्हा क्रीडा अधिकारी नीलम अडसूळ, क्रीडा अधिकारी राहुल गायकवाड, सचिन रणदिवे, शितल शिंदे यांनी अभिनंदन करून कोल्हापूर विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
स्क्वॅश स्पर्धेचा निकाल
१४ वर्षाखालील मुले ः १. श्रीकृष्ण विजय राठोड (कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय), २. रिचर्ड बेंटो रॉड्रीक्स (स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल, कोलगाव), ३. सार्थक राजकुमार वायंगणकर (कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय), ४. रोनक राकेश पवार (स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल, कोलगाव), ५. जयेश विश्वनाथ राणे (बाल शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल).
१४ वर्षांखालील मुली ः १. अस्मी धीरज सावंत (स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल, कोलगाव), २. पुर्वी संजय आरोलकर (स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल, कोलगाव), ३. रिषिता विनित शर्मा (पोद्दार इंटरनॅशनल स्कूल, कणकवली), ४. श्रेया प्रमोद यादव (बाल शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल), ५. डिम्पल कुमारी रुकाराम प्रजापती (बाल शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल).
१७ वर्षांखालील मुले ः १. सोहम अनंत तिवरेकर (डॉन बॉस्को ॲण्ड ज्युनिअर कॉलेज, ओरोस), २. वीर वैभव कुमार कल्याणकर (कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, कासार्डे), ३. पार्थ लक्ष्मीकांत कल्याणकर (कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय), ४. निर्मित विनायक कुडतरकर (डॉन बॉस्को ॲण्ड ज्युनिअर कॉलेज, ओरोस), ५. विश्वतेज विकास औताडे (आयडियल इंग्लिश स्कूल, वरवडे).
१७ वर्षांखालील मुली ः १. शिवानी महादेव जाधव (कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, कासार्डे), २. आस्था अतुल सावंत (कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय), ३. चैत्राली न्हानु दळवी (न्यू इंग्लिश स्कूल, ओरोस), ४. श्रावणी रमेश जाधव (आयडियल इंग्लिश स्कूल, वरवडे), ५. आर्या ओमप्रकाश गुप्ता (डॉन बॉस्को ॲण्ड ज्युनिअर कॉलेज, ओरोस).
१९ वर्षांखालील मुले ः १. मीत सुशांत मुळ्ये (डॉन बॉस्को ॲण्ड ज्युनिअर कॉलेज, ओरोस), २. यश सुधीर भरडे (कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, कासार्डे), ३. सार्थक शंकर तळेकर (कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय),४. सुरज ताराचंद तळेकर (न्यू इंग्लिश स्कूल, कसाल), ५. तुषार अजय पाताडे (कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, कासार्डे).
१९ वर्षांखालील मुली ः १. रश्मी संतोष वळंजू (कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय), २, तन्वी दीपक साईम (कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय), ३. तेजस्वी संतोष गुरव (कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय),४. सुदिक्षा सूर्यकांत मेस्त्री (कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय), ५. प्रणाली किसन ठोंबरे (कणकवली कॉलेज, कणकवली).