
सुवर्ण, रौप्य पदक पटकावले
गंगापूर ः कष्ट, जिद्द आणि आत्मविश्वासाच्या जोरावर गंगापूरचा उदयोन्मुख पॅरा अॅथलीट आर्यन उदय देशमुख याने राष्ट्रीय स्तरावर आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.
मध्य प्रदेशातील ग्वालियर येथे नुकत्याच पार पडलेल्या आंतरशालेय राष्ट्रीय पॅरा अॅथलिट स्पर्धेत आर्यनने दुहेरी यश संपादन करत सुवर्ण आणि रौप्य पदकांची कमाई केली. गंगापूरच्या या पॅरा खेळाडूने राष्ट्रीय स्तरावर गंगापूरचे नाव उज्ज्वल केल्याने शहरात अभिमानाची भावना व्यक्त केली जात आहे.
शहरातील वंडर किड्स इंग्लिश स्कूलमध्ये दहावीमध्ये शिक्षण घेणाऱ्या आर्यनने १५०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत रौप्य पदक पटकावले, तर ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत दमदार कामगिरी करत सुवर्णपदक आपल्या नावे केले. आर्यनच्या या यशामागे प्रशिक्षक डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचे ॲथलेटिक्स प्रशिक्षक सुरेंद्र मोदी, अभय देशमुख, स्मिता पठारे, ज्ञानेश्वर नरोडे, ऋषी गड्डीमवाळ, नईम शेख, प्रा उदय तगरे,अमीन पटेल, हाश्मी, वडील उदय देशमुख, आई प्रा वैशाली देशमुख यांचे मार्गदर्शन लाभले आहे. आर्यनच्या या यशाबद्दल शाळेचे संचालक महावीर कटारिया, सपना कटारिया, मंगेश जोशी, राजेंद्र मोरे, सोपान देशमुख, उमाकांत देशमुख, भूषण देशमुख, मंगेश देशमुख, शिवा देशमुख, बंडू देशमुख, हाश्मींसह इत्यादींनी शुभेच्छा दिल्या आहेत.