
छत्रपती संभाजीनगर ः नांदेड येथे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय सेपक टकरॉ स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर संघाने चमकदार कामगिरी नोंदवत तिसरा क्रमांक पटकावला आहे.
महाराष्ट्र राज्य सेपक टकरॉ असोसिएशनच्या मान्यतेने व नांदेड जिल्हा सेपक टकरॉ असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने २५ वी सब-ज्युनिअर व २६ वी ज्युनिअर महाराष्ट्र राज्य सेपर टकरॉ अजिंक्यपद स्पर्धा नांदेड येथे घेण्यात आली. या स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर जिल्हा संघाने दमदार कामगिरी करत टीम इव्हेंटमध्ये उपविजेतेपद पटकावले.
या संघाचे नेतृत्व कर्णधार कारण वाकोदकर याने केले. मुख्य प्रशिक्षक मनोज बनकर, सहाय्यक प्रशिक्षक संगीता बनकर तसेच संघ व्यवस्थापक सुनील देशपांडे यांनी संघाला मार्गदर्शन केले. या घवघवीत यशाबद्दल जिल्हा संघटनेचे अध्यक्ष सतीश इंगळे, उपाध्यक्ष धर्मेंद्र काळे, मुख्याध्यापक मैंद सर, प्रा. पवार सर, कोंडके सर, सचिव मनोज बनकर यांनी संघाचे कौतुक केले आहे.
सब ज्युनियर मुलांचा संघ
कारण वाकोदकर (कर्णधार), अबु उबेद खान, श्रेयस गोडबोले, अरफान शेख, रोहित वाकोदकर, रेहान पठाण, युवान सोंडारे, गौरव थोरात, कार्तिक सातदिवे, समर बनकर, स्वरूप देशपांडे, रौनिक बनकर.