
अहिल्यानगर : अहिल्यानगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेमार्फत १९ वर्षांखालील खेळाडूंसाठी जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा आयोजित केली आहे.
गायत्री मंगल कार्यालय, महाजन गल्ली येथे या स्पर्धेचे नियोजन केले असून रविवारी (७ सप्टेंबर) सकाळी १० वाजता स्पर्धेचे उद्घाटन केले जाईल. नांदेड येथे होणाऱ्या राज्य स्पर्धेसाठी अहिल्यानगर जिल्ह्याचा मुलांचा व मुलींचा संघ या स्पर्धेतून निवडण्यात येणार आहे. अंतिम निकाल पत्रका प्रमाणे ४ मुले व ४ मुली, म्हणजेच प्रथम ४/४ खेळाडू राज्यस्तरावर पाठविण्यात येतील. अहिल्या नगर जिल्ह्यातून निवड झालेल्या खेळाडूंची राज्य निवड चाचणी स्पर्धेची प्रवेश फी १ हजार रुपये संघटनेमार्फत भरली जाईल व तेथे राहण्याची व्यवस्था सुद्धा केली जाईल. पहिल्या पाच खेळाडूंना (मुले व मुली) आकर्षक करंडक सुद्धा देऊन गौरविण्यात येणार आहे
सदरील स्पर्धा ९, ११, १४, १७ व १९ वर्षांखालील मुले व मुलींसाठी खुली असून खेळाडूंनी येताना बुद्धिबळ पट, सोंगट्या, जेवणाचा डबा व पिण्याचे पाणी आणावे. सर्व सहभागी खेळाडूंनी सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल.
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचा नुकताच क्रीडा सप्ताह झाला आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरांगे व विशाल गर्जे यांनी असे जाहीर केले आहे की अंडक ९, ११, १४, १७, १९ या ग्रुप मधील पहिल्या पाच विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात येतील. तसेच १९ वर्षांखालील गटात पहिल्या पाच खेळाडूंना जिल्हा क्रीडा कार्यालयाच्यावतीने आकर्षक ट्राॅफी देण्यात येईल. हे खेळाडू अहिल्यानगरचे प्रतिनिधित्व नांदेड येथे होणाऱ्या राज्य स्पर्धेत करतील.
ही स्पर्धा यशस्वी करण्याकरिता अहिल्यानगर जिल्हा बुद्धिबळ संघटना प्रयत्नशील असून अहिल्यानगर जिल्ह्यातील अधिकाधिक खेळाडूंनी उत्स्फूर्तपणे स्पर्धेत सहभाग नोंदवावा असे आवाहन जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया, उपाध्यक्ष नरेंद्र कुलकर्णी यांनी केले आहे.
अधिक माहितीकरिता यशवंत बापट (९३२६०९२५०१), पारूनाथ ढोकळे (९८५०७०४२६८), देवेंद्र ढोकळे (८६००४१२६३३), प्रशांत धंगेकर (९९२१३७७९८८), मनीष जस्वानी (८८५५००२३३२), सनी गुगळे (८८८४४५५३३५) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन अहिल्यानगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेने केले आहे.