मयंक अग्रवाल यॉर्कशायर काउंटी संघाकडून खेळणार

  • By admin
  • September 6, 2025
  • 0
  • 0 Views
Spread the love

नवी दिल्ली ः भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज मयंक अग्रवाल गेल्या तीन वर्षांपासून संघाबाहेर आहे. मयंक देखील सतत देशांतर्गत क्रिकेट खेळून भारतीय संघात पुनरागमन करण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यात तो यशस्वी होईल अशी त्याला आशा आहे. त्यासाठी त्याने आता काउंटी क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला आहे.

मयंकने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि सुरुवातीच्या सामन्यांमध्ये खूप चांगली कामगिरी केली, परंतु फिट नसल्याने त्याला बाहेर पडावे लागले आणि त्यानंतर त्याला पुनरागमन करणे खूप कठीण झाले. आता मयंक अग्रवालने एक मोठा निर्णय घेतला आहे आणि इंग्लंडमधील काउंटी चॅम्पियनशिपमध्ये खेळण्याचा निर्णय घेतला आहे.

यॉर्कशायर संघाकडून खेळणार
मयंक अग्रवालने काउंटी चॅम्पियनशिपमध्ये यॉर्कशायर संघाकडून खेळण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये ईएसपीएन क्रिकइन्फोच्या बातमीनुसार मयंक ८ सप्टेंबर रोजी टॉन्टनमधील काउंटी मैदानावर सोमरसेट संघाविरुद्ध होणाऱया सामन्यापूर्वी यॉर्कशायर संघात सामील होईल. त्यात त्याला एकूण ३ सामने खेळण्याची संधी मिळेल. यानंतर मयंकला भारतात परतावे लागेल कारण रणजी ट्रॉफी २०२५-२६ हंगाम सुरू होणार आहे. मयंक पहिल्यांदाच काउंटीमध्ये खेळताना दिसणार आहे. मयंक अग्रवालने २०२२ मध्ये श्रीलंकेच्या संघाच्या भारत दौऱ्यादरम्यान बेंगळुरूच्या मैदानावर कसोटी क्रिकेटमधील शेवटचा सामना खेळला होता.

मयंक अग्रवालसाठी भारतीय संघाच्या कसोटी संघात परतण्याचा मार्ग खूप कठीण आहे. त्याने आतापर्यंत त्याच्या कारकिर्दीत एकूण २१ कसोटी सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने ४१.३३ च्या सरासरीने १४८८ धावा केल्या आहेत. या काळात मयंकच्या बॅटमधून एकूण ४ शतकी डाव झळकले आहेत, ज्यामध्ये २ द्विशतके देखील आहेत, याशिवाय मयंकने ६ अर्धशतकी डावही खेळले आहेत. मयंकला ५ एकदिवसीय सामने खेळण्याची संधी मिळाली पण तो एकूण ८६ धावाच करू शकला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *