छत्रपती संभाजीनगर ः जागतिक फिजिओथेरपिस्ट दिनानिमित्त रविवारी (७ सप्टेंबर) मोफत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
छत्रपती संभाजीनगर फिजिओथेरपिस्ट कम्युनिटी या संस्थेच्या वतीने रविवारी सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत पाटीदार भवन येथे हे मोफत तपासणी शिबीर होणार आहे. ज्यांना सांधेदुखी, मान दुखी, खांदे दुखी, कंबर दुखी, अर्धांगवायू, गुडघे दुखी, स्पोर्ट्स इन्जुरी, पाठ दुखी, मज्जासंस्थाचे आजार, स्त्रियांचे आजार आदीपैकी कोणतेही आजार, त्रास आहे, ते सर्वजण या शिबिराचा लाभ मोफतपणे घेऊ शकतात.
हे शिबीर सर्वांसाठी खुले आहे. यात जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन डॉ शुशांक पवार, डॉ आदित्य अन्वीकर, डॉ संकेत मुंगीकर, डॉ श्रीनिवास शिंदे, डॉ प्रशांत पारदे, डॉ स्वरनील पटेल, डॉ वैभव पहाडे यांनी केले आहे.